Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सासूने जावयाची टूथपेस्ट वापरली,जावयाने केले असे काही...

Webdunia
बुधवार, 14 ऑगस्ट 2024 (14:35 IST)
कुटुंबात लहानमोठे भांडण होतच असतात. पण कधी कधी हे भांडण इतके विकोपाला जातात की संपूर्ण कुटुंबच उध्वस्त होते. अशीच एक घटना सध्या व्हेनिस मध्ये घडली आहे. एका पतीने आपल्या सासूची खासगी आयुष्यात होणाऱ्या ढवळाढवळला कंटाळून पत्नीला घटस्फोट देण्याचा विचार करत तिला नोटीस बजावली.
 
 एका व्यक्तीने आपल्या सासूवर नाराज होऊन पत्नी आणि मुलीला सोडून दिले. सासूची चूक एवढीच होती की तिने आपल्या जावयाची टूथपेस्ट वापरली  होती.
 
आपल्या पोस्टमध्ये, 38 वर्षीय व्यक्तीने लिहिले की तो आणि त्याची 35 वर्षीय पत्नी आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह इटलीतील व्हेनिसला जाण्याचा खूप दिवसांपासून विचार करत होते. पत्नीने आग्रह करून आपल्या आईला देखील सोबत नेले. तिथं गेल्यावर पतीला कळाले की पत्नीने एकच रूम बुक केले होते. त्यात मुलगी आणि माझी सासू देखील राहत होती. 

नंतर सासूने मुली आणि जावयाचा वस्तू वापरण्यास सुरु केले. त्याच्या सासूने आपल्या पत्नीचे फेस वॉश, शैम्पू आणि लोशन यासारखे "महागडे" उत्पादने सामायिक करताना पाहून तो दुःखी होता. जावयाचा संताप तेव्हा झाला जेव्हा सासूने त्याची टूथपेस्ट वापरली. त्याने सासूला असे करू नका म्हणत समजावले या वरून पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. 

रागाच्या भरात येत जावयाने सहल मध्येच सोडून पत्नी आणि मुलीला एकटे टाकून घरी परत येण्यासाठी एअर तिकीट बुक केली आणि घरी परतला.पत्नीने त्याला अनेकवेळा फोन केला पण त्याने उत्तर दिले नाही. त्यांनी आता विभक्त होण्याचा विचार केला आहे. 
 
या कुटुंबातील वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जेव्हा त्या व्यक्तीने कबूल केले की त्याने आपल्या पत्नी आणि मुलीला युरोपमध्ये सोडले कारण त्याने आपल्या सासूची टूथपेस्ट वापरली होती. या व्यक्तीला त्याच्या कृत्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रियांचा सामना करावा लागला.
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments