Marathi Biodata Maker

मुंबई विमानतळ दर्जेदार सेवा देण्यात जगात नंबर १

Webdunia
गुरूवार, 8 मार्च 2018 (15:26 IST)

सर्वाधिक प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या बाबतीत मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगात नंबर १ ठरले आहे. एअरपोर्टस् कौन्सिल इंटरनॅशनलने (एसीआय) जगभरातील विमानतळांचे सर्वेक्षण करून ही क्रमवारी दिली आहे. वर्षाला चार कोटींपेक्षा अधिक प्रवासी मुंबई विमानतळावरून प्रवास करतात. मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ही दोन्ही विमानतळे सर्वाधिक प्रवाशांना सेवा देण्यात जगात अव्वल ठरली आहेत. 

तर
२०१७ या वर्षात दीड कोटी प्रवाशांना सेवा देऊन हैदराबाद विमानतळही त्यांच्या पंक्तीत येऊन बसले आहे. एसीआयने केलेल्या सर्वेक्षणात जगभरातील विमानतळांवर प्रवाशांची मते जाणून घेतली. विमानतळावरील प्रवेश, सुरक्षाव्यवस्था, रेस्टरूम्स, रेस्टॉरंटस् आदी ३४ सेवांबाबत प्रवाशांकडून माहिती घेतली गेली. दिल्ली विमानतळ हे या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक व्यस्त २० विमानतळांमध्ये सातवे विमानतळ ठरले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला

ऑलिम्पिक पदक विजेता टेनिसपटू लिएंडर पेस तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील

एका किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी वसईत चिमुकल्याला जमिनीवर आपटले

नक्षलवादाच्या निर्मूलनाचे श्रेय एकट्याने घेणे दुर्दैवी, अमित शाह यांच्या वक्तव्याला प्रियंका चतुर्वेदी यांचे प्रत्युत्तर

नालंदा : शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू; पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची घोषणा

पुढील लेख
Show comments