Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

येड्यांचा बाजार

येड्यांचा बाजार
, सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (14:38 IST)
सद्या विरोधकांना वाटतय की पंतप्रधान पद हे बाजारातील भाजीपालाच आहे. अन जनते कडून झुंडशाही करुन सहज विकत घेऊ पण पंतप्रधान पद येवढ स्वस्त झालय का की जनता सहज पद कुणाच्याही हाती देईल ? नाही हो इथल्या बायकाही कोथंबिरची जुडी पारखुन घेतात. अन या बायकांबरोबर सद्या त्यांच्या पिशव्या उचलायला त्यांचे नवरे असतातच त्यामुळे नवरेही नवरेही फार हुशार झाले आहेत. अन सद्ध्यातरी बायकांच राज आहे. सद्या हे विनोदी बोललं गेलं पण परीस्थिती खरच सद्यस्थितीत वेगळी आहे. भाजप जिंकावा असीच परीस्थिती असताना त्यांना बरेच विषय बर्याच गोष्टी आपल्या अजेंड्या घ्याव्या लागणार आहेत. अन प्रचार करताना राफेल सह इतरही गोष्टी बरोबर पटवून द्यावे लागणार आहेत. संघालाही नाराज करुऩ चालनार नाही.
 
सद्या तरी मोदींची कँम्पेनिंग जोरात चालू आहे. नमो विथ नेशनच्या माध्यमातून बरेच स्वयंसेवक ज्यांना मोदीच पंतप्रधान पदी हवे आहेत ते नक्कीच जॉईन होत आहेत. गेल्या दोन महीन्यापुर्वीच अमित शहा यांनी सोशल मिडीयाची बैठक घेतली. तर एनडीए अजून बरीच घटक पक्ष येण्याच्या तयारीत आहेत. तर बाकी धमक्या देऊन बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. पण बाहेर पडणार्यापेक्षा सामील होणारेच जास्त असतील यात काही शंकाच नाही. महाराष्ट्रातही सेनेच्या धमक्या देऊन झाल्या की समझोता नक्की होणार अन जास्तीतजास्त जागा कशा पदरात पाडून घ्यायच्या या साठीचीच रणनिती सेना आखत आहे..बिहारात तर पहीलेच जागा वाटप पुर्ण झालय. सद्या तरी बिहार आघाडीवर आहे.पण उत्तर प्रदेश मध्य सपा बसपा एकत्र आल्यामुळे पहीले पेक्षा बर्याच जागा कमी होताना नक्कीच दिसतील. मध्यप्रदेशात तर जनतेचा भाजपवर राग आहेच कारण व्यापमं वगैरे सारखे भ्रष्टाचार समोर आले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशात सपाटून मार भाजप खाऊ शकतो. छत्तीसगढमध्येही तीच परीस्थिती आहे. जनतेला विकास हवा असतो जनता विकासाच्याच नावावर मतदान करते.
 
तिकडे महागटबंधन झालय पण पंतप्रधान कोण या विषयाच बाळतपण अजून झालेल नाही. बर्याच दिवसापासून गाभन असलेला हा विषय लवकरच बाळतपण होऊन बारसही होईल. पण अजून म्हैस गाभण आहे अन सातवा महीना चालू आहे. लवकरच तुम्हाला चांगली बातमी ममता पवार माया राहूल यांच्या कडून मिळेलच.पण हा संसार टिकला पाहीजे नाहीतर झालेल्या पोरला वाली कुणीच नसेल.
 
राहूलच्या नेतृत्वावर काही पक्ष प्रश्नही उपस्थित करत आहेत.सद्यातरी राहूलच नाव आघाडीवर असलं तरी त्याचं नाव पदासाठी जाहीर होताच बरेच पक्ष महागटबंधनातून माघार घेतील यात शंकाच नाही. पण आघाडीत आतापर्यंतचा इतिहास असाच आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडणूक झाल्यावर समजतो. गेल्या निवडणूकीतही उमेदवार घोषित झाला नव्हता आताही उमेदवार घोषित होईल यात शंकाच आहे.
 
व्हिएचपीनं भला मोठा अणुबॉम्बच कॉंग्रेसच्या गोठात टाकलाय. ऱाममंदीर बांधा म्हणून पण कॉंग्रस याला समर्थन देण तुर्तास तरी शक्य नाही.महाराष्ट्रातही कॉंग्रसला फारश्या आशा नाहीत.कारण युती जर झाली तर 40 च्या जवळ पास लोकसभासदस्य भाजप सहज जिंकू शकतो. विधान सभेतही युती झाली तर पुढच्या काळातही भाजपचीच सत्ता आहे.
 
कॉंग्रेस ह्या निवडणूकीत भाजपला नक्कीच कॉपी करेल. पण भाजपच्या डोक्यावर संघाचा आशीर्वाद आहे त्यामुळे कॉंग्रेस कुठतरी फेल जाईल यात शंकाच नाही. कारण संघाच संपर्क, संघाची निवडणूक विषयीची रणनिती अभ्यासना जोगी असते. अन ती कॉंग्रेसच्या कल्पनेबाहेरची गोष्ट आहे.त्यामुळ कॉंग्रसने भाजपला कॉपी करण्यात काहीच मोठा फायदा होईल अस नाही. अन संघाला कॉपी करन म्हणजे खुप कठीण काम आहे. दहावीच्या परीक्षेत फिरत पथक येत अन त्यात एखाद्या हुशार मुलानं नाव सांगाव. सर हा कॉपी करतोय बस कॉपी करणारा त्याच वेळेला कार्यवाही पुढची परीक्षाच पोराची बंद होईल. अशीच परीस्थिती कॉंग्रेसची होईल यात शंकाच नाही. हे हुशार पोरगं बर्याच वेळेला परीक्षेला वेगळच बसतं त्यामुळ कुणीच कॉपी करु शकत नाही.
 
कॉंग्रेस भाजपला बदनाम करुनच हरवण्याचा चंग बांधून आहे.राफेल सारख्या विषयात कॉंग्रेसचा येड्यांनायक रा फेल रा फेल बोलतोय. पण जनता हुशार आहे. पण जनतेला भ्रमित करऩ कॉंग्रेसच काम आहे अन त्या सुत्रावरच हे सत्तेच्या गळ्यात मंगसुत्र घालण्याच्या तयारीत आहेत. हवा तसा उपभोग करण्याच्या स्वप्नात कॉंग्रेसी उपवर जोशात आहे. भाजपला देशा बाहेर बदनाम करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करत आहे. महागटबंधन करुन कॉंग्रेसला वाटत आहे आपणच सत्तेत येऊ. हे धर्मनिरपेक्ष लोक आता मतांसाठी मंदीरात जायला लागले आहेत. माणसाच कस असत ना कधी कुठलं संकट आलं की देव आठवतो.
 
कॉंग्रेस पहीलेच अर्धी हरलीय कारण महागटबंधन करुन त्यांनी ते जनतेला दाखवून दिलच आहे.पण कॉंग्रेस पेक्षा भाजपच योग्य हे सध्यातरी सामान्य जनतेला कळालय.हवी भाव असेल, मोदींची विदेश नीती, मोदी जादू देशाबाहेरपण चालत आहे.
 
शेवटी एवढच म्हणन जनतेलाच निर्णय घ्यायचाय मोदी की महागटबंधन?

Virendra Sonawane Jalgaon 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिकेटचा देव सचिन आणि क्रिकेट युद्ध