rashifal-2026

भावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून घेतली गळाभेट

Webdunia
बुधवार, 11 एप्रिल 2018 (10:32 IST)

एका कार्यक्रमात एक अभूतपूर्व योग पाहायला मिळाला. जवळपास 6 वर्षांपासून राजकारणात एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावाबहिणींनी सगळे मतभेद विसरून गळाभेट घेतली. त्यांच्या गळाभेटीमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या  दुरावलेल्या भावाबहिणींच्या भेटीनं राजकारणातली उत्कृष्ट परंपरा पुन्हा एकदा समोर आली. राजकारणात कोणीही कधीही कोणाचं कायमचं शत्रू नसतं याचं उत्तम उदाहरण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी उभ्या महाराष्ट्राला दिलंय.

दरम्यान, पंकजा मुंडे सत्तेत मंत्रिपदी आहेत, तर धनंजय मुंडे हे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आहेत. दोघांकडेही राजकारणातील पदं आहेत. पण सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या या दोघांना गळाभेट करताना पाहिलं की, रक्ताचं नात कधीही संपत नाही याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भारत-न्यूझीलंड फायनलसाठी रेल्वेची मोठी भेट; मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान विशेष गाड्या धावणार

LIVE: प्रताप सरनाईक यांनी अर्थसंकल्पाला "विकसित महाराष्ट्र २०४७ साठी गुंतवणूक" असे संबोधले

इराण-अमेरिका तणावाचा फटका; गॅसच्या दरात मोठी वाढ

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरून राजकीय गोंधळ; विरोधक म्हणतात की हा फक्त आकड्यांचा आणि पोकळ आश्वासनांचा खेळ

"मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही..." नितीन गडकरी यांचे स्पष्ट शब्द; पेट्रोलियम लॉबीला इशारा

पुढील लेख
Show comments