Dharma Sangrah

सनातनच्या कार्यकर्त्यांचा सत्कार नाही धिक्कार व्हायला हवा ;

Webdunia
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (09:35 IST)
- शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल - विद्या चव्हाण
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांच्याविरोधात आज प्रचंड घोषणाबाजी केली. मुंबई मराठी पत्रकार संघात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते पुनाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्त्वात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत आणि सनातन संस्थेविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
 
यावर प्रतिक्रिया देताना विद्या चव्हाण म्हणाल्या की अनेक विचारवंतांच्या हत्येत सनातन संस्थेचा सहभाग असल्याचे धागेदोरे सापडत आहेत. अशा सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यापेक्षा धिक्कार करायला हवा. शिवसेनेवर निशाणा साधत विद्या चव्हाण म्हणाल्या की सनातनसारख्या हिंसक संस्थेच्या पुनाळेकर यांचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामार्फत सत्कार करण्यात येत आहे. हा प्रकार फार दुर्दैवी आहे. या प्रकारामुळे शिवसेनेची प्रतिमा मलीन होईल. येत्या काळात शिवसेनेला याची राजकीय किंमत मोजावी लागेल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

मुंबईत आंतरराष्ट्रीय कट उघडकीस: कोट्यावधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; अमित शाह म्हणाले-ऐतिहासिक यश मिळवले

आईने शेवटच्या श्वासापर्यंत बाळाला छातीशी कवटाळून ठेवले, नर्मदा क्रूझ दुर्घटनेचे ते हृदयद्रावक दृश्य पाहून साऱ्यांचे डोळे पाणावले

LIVE: मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई आणि पुणे दरम्यानचे अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन केले

खरोखरच बंद होणार आहे का लाडकी बहीण योजना? जाणून घ्या सरकारचे स्पष्टीकरण

नम्रपणे आणि मराठीत बोलून विश्वास जिंका; चालकांनी आता प्रवाशांना 'ताई-मावशी' आणि 'भाऊ-काका' म्हणावे; परिवहन विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जारी

पुढील लेख
Show comments