Festival Posters

आता लक्ष राज्यपालांकड, मात्र ते मूळ गुजरातचे

Webdunia
मंगळवार, 15 मे 2018 (17:28 IST)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला तरी सत्ता स्थापनेचे त्यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही. कारण कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार असं चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यातच जेडीएसनं काँग्रेसची ऑफर स्वीकारून सत्तास्थापनेचा दावा करू असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी कोणाला आमंत्रण द्यायचं हे आता कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यावर आहे. विशेष म्हणजे ते वजुभाई वाला हे मूळ गुजरातचे आहेत. त्यामुळेच सत्तेच्या चाव्या या गुजरातकडेच असल्याचं म्हणलं जात आहे.

भाजपच्या विजयी आणि आघाडीवर असणाऱ्या उमेदवारांचा आकाडा ११३वर पोहोचला होता. त्यामुळे भाजपमध्ये उत्साही वातावरण होतं. मात्र काही वेळात हा आकडा १०४ इतका खाली आला. त्याच दरम्यान, काँग्रेसनं जेडीएसला मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन आपल्या सोबत घेतलं. ते एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणं त्यांना शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे. गोव्यात भाजपनं अशीच खेळी केली होती.आता सगळं लक्ष राज्यपालांकडे लागलं आहे. मात्र संपूर्ण निकाल आल्याशिवाय कोणत्याही पक्षाला निमंत्रण देणार नाही, असं कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव यांच्या ६ बंडखोर खासदारांना दिल्लीहून जयपूरला हलवण्यात आले

इस्लामाबाद MoU: पाकिस्तानसाठी एक राजनैतिक विजय, पण भारताला काय फायदा?

थ्री-लाईन व्हिप डावलून खासदार गैरहजर; पक्षाच्या बैठकीला केवळ ३ खासदार उपस्थित; ६ बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस

विधान परिषद निवडणूक: ऐनवेळी शिंदेंच्या फोन कॉलमुळे चौधरींचा अर्ज मागे, महायुतीचा विजय जवळपास निश्चित!

अवघ्या ४८ मिनिटांत गाठता येणार मुंबई-पुणे; भारत स्वतः तयार करणार पुढील बुलेट ट्रेन कॉरिडोर

पुढील लेख
Show comments