suvichar
✕

भगवा कोणाचा आयोध्येत शिवसेना विरोधात विहिप

Webdunia
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (17:24 IST)
लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असल्याने राम मंदिराच्या मुद्यावरून वातावरण तापवले जात आहे. रविवारी म्हणजे 25 नोव्हेंबरला संघ परिवार आणि शिवसेना अयोध्येत आमने-सामने असणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाहीर सभा घेणार असून, त्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने अयोध्येत धर्म धर्मसभेचं आयोजन केल आहे. शिवसेनेपेक्षा ही सभा मोठी व्हावी यासाठी संघ परिवाराने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे शिवसेना विरोधात विहिंप असे चित्र आहे. राम मंदिर बांधणं होत नसेल तर सांगा, आम्ही बांधतो असं थेट आव्हान देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा जाहीर केला त्यामुळे भाजपला आता भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. शिवसेना आयोध्येत आपले शक्तिप्रदर्शन करणार आहे. शिवसेनाला उत्तर देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं त्याच दिवशी अयोध्येत धर्मसभेचं आयोजन केले आहे. उत्तरप्रदेशात सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजप आणि अभाविप या संघपरिवारातल्या सर्व संघटना हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राम मोठे की राजकारण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रात एकात्मिक डिजिटल शासकीय सेवा प्लॅटफॉर्म सुरू होणार

महाराष्ट्रात २६ जानेवारी रोजी डिजिटल शासकीय सेवा प्लॅटफॉर्म सुरू होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडक निर्देश

शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुके दुष्काळग्रस्त घोषित

रुग्णांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारचा निर्णय; आता रुग्णांना उपचारापूर्वी खर्चाची माहिती मिळू शकेल

वाण निवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शक: गहू लागवड

पुढील लेख
Show comments