Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

देशात परतल्प्रयाची भावनिक पोस्ट ठरली शेवटची, गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन

देशात परतल्प्रयाची भावनिक पोस्ट ठरली शेवटची, गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन
नाशिकच्या असलेल्या आणि प्रसिद्ध गायिका गीता माळी यांच अपघाती निधन झाल आहे. मुंबईहून नाशिककडे येत असतांना गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरात असलेल्या लाहे फाटानजीक त्याच्या चारचाकी गाडीला अपघात झाला. सदरच्या अपघातामध्ये त्याचे निधन झाले. तर त्यांचे पती अॅड. विजय माळी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. माळी यांच्या निधनाने नाशिकमधील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
 
गेल्या तीन महिन्यापासून गीता या अमेरिका आणि न्यूयॉर्क येथील कॉन्सर्टमध्ये सहभागासाठी होण्यासाठी गेल्या होत्या. गुरुवारी सकाळी त्या मुंबईला विमानतळावर उतरल्या. त्यानंतर पती विजय माळी हे त्यांना घेण्यासाठी खासगी वाहनाने गेलेले होते. नाशिकला परतताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहापूरनजीक श्वानाला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन  धडकली. या घटनेत माळी यांना गंभीर दुखापत झाली होती. तात्काळ त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर पती विजय हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
 
गीता यांनी अल्पावधीतच गाण्यांमध्ये आपली छाप पाडली होती. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. शास्त्रीय आणि चित्रपट गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांनी संगीतात एम.ए. केलेले होते. २०१७ ऑस्ट्रेलियामधील सिडनी या शहरात वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी गायिका गीता यांना गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पतीसह आठ वर्षाचा मुलगा आहे.
 
मुंबईहून नाशिककडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात गीता माळी यांचा मृत्यू झाला. गीता माळी गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेत होत्या. मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांनी फेसबुकवर काही फोटो पोस्ट केले. 'मायदेशी दाखल. जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है. बऱ्याच कालावधीनंतर घरी आल्यानंतर अतिशय आनंदी आहे,' अशी पोस्ट लिहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील फोटो शेअर केले होते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकाच वेळी इतक्या वर्षांनी शिवसेनेच्या नेत्यांना भेटून कसे वाटले, भुजबळ म्हणतात की....