Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे निधन

Webdunia
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (16:32 IST)
BBC
प्रभावी वक्त्या, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे (८१) यांचे दीर्घ आजाराने निधन झालेआहे. विचारवंत आणि लेखिका प्रा. भावे यांचा शालेय जीवनापासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी संपर्क होता. मुंबईतील एलफिन्स्टन कॉलेजमधून त्यांनी मराठी आणि संस्कृत या विषयातून एम.ए ची पदवी घेतली. त्यानंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये त्या प्राध्यपिका म्हणून रुजू झाल्या. दयानंद कॉलेज, डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय या कॉलेजमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी शिकवले. त्यानंतर त्या रुईया कॉलेजमधून निवृत्त झाल्या.
 
पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाबाईंनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव, एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित इत्यादी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बिजापूरमध्ये प्रेशर बॉम्बच्या संपर्कात आल्याने जवान शहीद

पनवेल : सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने माजी पोलीस अधिकारीला जन्मठेपेची शिक्षा ठोठवली

शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र

LIVE: मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

मुंबई : ट्रॅकवरून चालणाऱ्या दोघांचा लोकल ट्रेनची धडक बसून मृत्यू

पुढील लेख
Show comments