Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

Webdunia
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (13:49 IST)
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी अथवा एखादी अफवा लोक कशी आणि का पसरवतात, या प्रश्नांचे उत्तर देणाऱ्या पहिल्या संशोधनाचे निष्कर्ष यावेळी बीबीसी जाहीर करत आहे. जगाच्या पाठीवर अशा खोट्या बातम्या अनेक राजकीय आणि सामाजिक तणावाचे मूळ असल्याचे निदर्शनास आले आहे. कधी याची परिणती लोकांचा बातम्यांवरचा विश्वास कमी होण्यात झाली आहे तर काही प्रसंगांमध्ये लोकांनी कायदा हातात घेऊन लोकांचा जीवही घेतला आहे.

याच खोट्या बातम्यांच्या मुळावर घाव घालण्यासाठी बीबीसीने ‘बियाँड फेक न्यूज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत भारत आणि केनियामध्ये आंतरराष्ट्रीय माध्यम साक्षरता कार्यक्रम तसंच चर्चासत्रांच्या आयोजनावर विशेष भर देण्यात आला आहे. यासह खोट्या बातम्यांवर आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधणाऱ्या ‘हॅकेथॉन’चे आयोजन तसेच आफ्रिका, भारत, आशिया पॅसिफिक, युरोप, अमेरिका तसेच मध्य अमेरिका इथे बीबीसीचे काही विशेष कार्यक्रम नियोजित आहेत.

फेक न्यूजविषयीचे जे संशोधन बीबीसी 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करत आहे, त्यासाठी भारत, केनिया आणि नायजेरियाच्या नागरिकांनी बीबीसीला त्यांच्या एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सची पडताळणी करण्याची अभूतपूर्व परवानगी दिली. त्याच आधारावर हे संशोधन करण्यात आले. 

बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ उपक्रमाअंतर्गत भारत आणि केनियात प्रसारमाध्यम साक्षरता कार्यशाळा यापूर्वीच सुरू झाल्या आहेत. खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी बीबीसीने युनायटेड किंगडममध्ये घेतलेल्या डिजिटल साक्षरता कार्यशाळांवर या कार्यशाळा आधारित आहेत. 

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस समूहाचे संचालक जेमी अँगस म्हणतात, “2018 साली मी प्रतिज्ञा घेतली होती की फेक न्यूजच्या जागतिक धोक्याबाबत बोलण्यापलीकडे जात, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस समूह अशा बातम्या रोखण्याच्या दिशेने काही ठोस पावले उचलेल. आज जागतिक स्तरावर माध्यम साक्षरतेचा निकृष्ट दर्जा पाहता आणि डिजिटल माध्यमात एखादी चुकीची माहिती कोणत्याही पडताळणीशिवाय सहजतेने पसरू शकते. त्यामुळे कोणत्याही विश्वासार्ह बातम्या देणाऱ्या समूहाला सक्रिय पावले उचलण्याची गरज इतिहासात पहिल्यांदाच पडत आहे. म्हणूनच आम्ही जे बोलत आहोत, ते करण्याच्या दिशेने आम्ही भारत आणि आफ्रिकेत थेट गुंतवणूक करून ठोस पावलं उचलत आहोत. ऑनलाइन शेअरिंग कसे होते, याच्या सखोल संशोधनासाठी निधी देण्यापासून ते जागतिक स्तरावर माध्यम साक्षरता कार्यशाळांचे आयोजन करण्यापर्यंत, तसेच जगभरात येत्या काळात होणाऱ्या काही महत्त्वाच्या निवडणुकांवर ‘बीबीसी रियॅलिटी चेक’द्वारे कडक लक्ष ठेवण्याचा प्रण करणे, अशा उपक्रमांमधून या वर्षी आम्ही, समस्येचे निदान करत त्यावर महत्त्वाकांक्षी उपाययोजना राबवण्याची पावले उचलत आम्ही याविषयी जागतिक स्तरावर आघाडी घेण्यासाठी आमचा मार्ग आखत आहोत.

‘बियाँड फेक न्यूजचे मालिका
एखादी बातमी फेक की रिअल, खरी की खोटी, पारदर्शक की जाणूनबुजून दिशाभूल करणारी –  यातला नेमका फरक कसा सांगणार? आणि याविषयी तुम्ही काय करू शकता जेणेकरून तुमची विश्वासार्हता वाढेल? या सगळ्या समस्यांवर ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाद्वारे बारकाईने लक्ष घातले जाणार आहे. याशिवाय व्हॉट्सअॅपमुळे भारतातल्या एका गावाने कसं एका खुनी जमावाचं रूप घेतलं, याचा सखोल वृत्तांतही यात समाविष्ट केला जाणार आहे. बीबीसीच्या जगभरातल्या निष्णात पत्रकारांच्या विविध बातम्या टीव्ही, रेडिओ आणि ऑनलाइन माध्यमातून या मालिकेत मांडल्या जाणार आहेत.

कार्यक्रम आणि माहितीपट
ग्लोबल : दिल्ली येथून, 12 ते 15 नोव्हेंबर
बीबीसी वर्ल्ड न्यूजच्या ‘ग्लोबल’ कार्यक्रमात मॅथ्यू अमरोलीवाला भारतातील फेक न्यूजच्या समस्येचा आढावा घेतात. इथे खोटी बातमी व्हायरल का होते आणि त्यातून विश्वासाची गळचेपी कशी होते, अशा पैलूंचा वेध घेण्यासाठी ते तंत्रज्ञान क्षेत्रातले जाणकार, राजकारणी, शाळकरी मुले तसेच बॉलिवुड कलाकारांशी बातचीत करतात.
बीबीसी वर्ल्ड न्यूज

बियाँड फेक न्यूज : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा, 12, 17 आणि 18 नोव्हेंबर
तंत्रज्ञानातील आघाडीचे मातब्बर फेसबुक, ट्विटर आणि गुगल यांना एका व्यासपीठावर एकत्र आणून खोट्या बातमीचा धोका, या विषयावर त्यांच्यात चर्चा घडवणे. तसेच त्यांच्या माध्यमांची खोट्या बातम्या पसरवण्यातली भूमिका आणि त्या रोखण्यासाठी त्यांनी उचलेली पावले, याविषयीचा परिसंवाद मॅथ्यू अमरोलीवाला घेतील.
बीबीसी वर्ल्ड न्यूज

द शी वर्ड : फेक मी, 10 नोव्हेंबर
जसे सोशल माध्यमाचे अवकाश विस्तारते आहे तसे आफ्रिकेतील तरुणाई केवळ ‘लाइक्स’वर जगते आहे. इन्स्टावर सेल्फीचे वेड असो वा गाडीचे, खोट्या प्रतिमेला अधिक झळाळी प्राप्त झाली आहे. आणि ती कायम राखण्यासाठी आता लोक प्रत्येक क्षणाचे, स्थितीचे फोटो क्लिक करण्यासाठी कुठलीही परिसीमा गाठायला तयार आहे.

आमच्या या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहे केनियाची एक 21 वर्षीय विद्यार्थिनी, जी आतापर्यंत सोशल मिडीयापासून लांब राहिली आहे. आम्ही तिला आव्हान दिले की केवळ इन्स्टाग्रॅमवरचा लुक, त्यावरील मेसेजेस, फॉलोअर्स आणि त्यातील तंत्रज्ञानाची मदत घेऊन तिने आपल्या ऑनलाइन प्रोफाइलची कायापालट करावी. केवळ पाच दिवसात ती आपल्या ऑफलाइन एकांतवासातून ऑनलाइन सार्वजनिक दुनियेत पदार्पण करू शकेल का? आणि आपली ही खोटी प्रतिमा टिकवू शकेल का?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

यूपीपीएससी किंवा स्पर्धक विद्यार्थीही झुकायला तयार नाही, मार्ग कसा निघणार?

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

चांगली बातमी! नरिमन पॉइंटवरून 30 मिनिटांत विरारला पोहोचता येणार

इंदिरा गांधी स्वर्गातून परत आल्या तरी कलम 370 बहाल होणार नाही अमित शहा म्हणाले

आरक्षणाबाबत जरांगे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments