Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

370 रुपयांच्या बिर्याणी विधानावरून देशभरात खळबळ, तरुणाला कामावरून काढले

veg biryani recipe
अलीकडेच, कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये प्रेक्षकांमधील एक मुलगा "370 रुपये वसूल झाले" असे काहीतरी म्हणतो. हा अश्लील विनोद व्हायरल झाला  आणि लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरु केले. एवढेच नाही तर त्याच्या या वक्तव्यावर गदारोळ झाला आणि कंपनीने त्याला कमावरूनच काढून टाकले. 
हिमांशु असे त्याचे नाव आहे. तो गुरुग्रामच्या एका डिझाइनर कंपनीत कामाला होता. कंपनीच्या संस्थापकांनी इंस्टाग्रामवर निवेदन जारी करून म्हटले की, व्हायरल व्हिडिओमध्ये हिमांशूने केलेले विधान आक्षेपार्ह असून कंपनी त्याच्या विचारांना पाठिंबा देत नाही अशा विचारांच्या विरोधात कंपनी असून कंपनीत महिला कर्मचाऱ्यांसह अनेक टीम सदस्यांची मुलखात घेऊन हिमांशू बद्दल चौकशी करण्यात आली.परंतु कामाच्या ठिकाणी हिमांशूविरुद्ध कोणतीही तक्रार आढळली नाही. 
 ALSO READ: राजेश एक्सपोर्ट्सच्या महाघोटाळ्यात LIC चा निधी अडकला; सामान्य गुंतवणूकदारांची कष्टाची कमाई धोक्यात?
कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्याच्या सहकाऱ्यांनी हिमांशूचे वर्णन एक व्यावसायिक, मेहनती आणि आदरणीय कर्मचारी असे केले होते.   असे असूनही, कंपनीच्या लक्षात आले की कामाच्या ठिकाणाबाहेरील त्याच्या टिप्पण्यांचा कंपनीच्या प्रतिमेवर आणि वातावरणावर परिणाम होत आहे.   
परिणामी, कंपनीने हिमांशूला कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. कोणीही चुका करू शकतो आणि त्याचे परिणाम भोगले पाहिजेत.

नेमकं काय प्रकरण होतं?

 
प्रणीत मोरे यांच्या शोमध्ये एका व्यक्तीने खुलासा केला की, तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता, जिथे त्याने तिला ३७० रुपयांची बिर्याणी खाऊ घातली होती. पणजेव्हा त्या मुलीने त्याला घरी सोडायला सांगितले, तेव्हा त्या व्यक्तीने बिर्याणीसाठी खर्च केलेले370 रुपये परत मागितले .
 
प्रणीतच्या शोमधील ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि महिलांप्रति असंवेदनशील व अश्लील असल्याबद्दल तिच्यावर टीका झाली. 
 
तथापि, वाद वाढल्यानंतर हिमांशूने सोशल मीडियावर माफी मागितली. त्याने सांगितले की कोणालाही दुखवण्याचा त्याचा हेतू नव्हता. तरीही, लोकांचा संताप कमी झाला नाही. वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर, हिमांशूने त्याचे सोशल मीडिया खाते निष्क्रिय केले. असे असूनही, वाद कमी झाला नाही. 
 Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: गोदावरी नदीत 50-60 भाविकांनी भरलेली बोट उलटली