Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लता दीदी म्हणाल्या नक्कल करून सफलता मिळत नाही

Webdunia
बुधवार, 4 सप्टेंबर 2019 (09:58 IST)
लता मंगेशकर हे नाव ऐकताच आपले कान आणि मन तर सुखावतेच त्या बरोबर अजरामर गीत सुद्धा आठवतात, तर त्यांच्या गायनाची नक्कल करत देशात लाखो ओर्केस्टा आपले रोजी रोटी चालवतात. तर जगात आपली एक ओळख निर्माण केली आहे. मात्र आता सोशल मीडियामुळे कोणीही काहीही करते आणि प्रसिद्धीच्या झोतात येते. असाच प्रकार रानू मंडल यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून ते हिमेश रेशमिया यांनी त्यांना गाण्याची संधी देईपर्यंतचा प्रवास आपल्याला सर्वाना दिसला आहे. हिमेश रेशमियाने त्यांना त्याच्या चित्रपटासाठी ३ गाणी म्हणण्याची संधी दिली. रानू मंडल यांचं आयुष्यच यामुळे बदलले आहे. त्यांच्या आवाजाची सोशल मीडियावर जोरदार  चर्चा होते आहे. मंडळ ने इक प्यार का नगमा है हे अतिशय उत्तम गायलेलं लता मंगेशकर यांचं गाणं कॉपी करत तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता रानू मंडल यांच्या प्रसिद्धीबाबत, गाण्याबाबत पहिल्यांदाच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
काय आहे लता मंगेशकर यांची प्रतिक्रिया?
“मी गायलेली गाणी गाऊन, माझ्या नावामुळे आणि माझ्या कामामुळे कुणाचं भलं झालं तर मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र माझा या गोष्टीवर विश्वास आहे की एखादी गोष्ट कॉपी करुन, नक्कल करुन प्रसिद्धी मिळते मात्र ती प्रसिद्धी ते यश फार काळ टीकत नाही. अनेक उदयोन्मुख गायक, गायिका या ज्येष्ठ कलाकारांची गाणी म्हणतात. किशोरदा, मोहम्मद रफी, आशा भोसले, मुकेश यांचीही गाणी म्हटली जातात. त्यामुळे काही काळ ही गाणी म्हणणाऱ्या गायकांना लक्षात ठेवलं जातं. त्यांची चर्चा होते मात्र नंतर ती प्रसिद्धी दीर्घकाळ टीकत नाही” मात्र एक खरे आहे. कितीही कॉपी किंवा जुळवूंन आवाज काढला तरी लता मंगेशकर यांच्या आवाजाची बरोबर आणि त्यांची संगीत क्षेत्रातील योगदान कोणीच विसरू शकत नाहीत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments