Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पक्ष्यांचा खून करणारे हे झाड तुम्हाला माहीत आहे का?

Webdunia
हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यामधल्या उष्णकटिबंधीय पाण्याच्या प्रदेशात एक पिसोनिया नावाचं फुलझाड असतं. फुलांचं झाड म्हणजे ऐकायला तर मस्त वाटतंच, पण पाहायलाही मस्त असेल, असंच वाटतं ना? मग थांबाच. हे पिसोनिया नावाचं झाड अट्टल सिरियल किलर आहे. ते ही थंडपणे बळींना आकर्षित करुन, त्यांचा हालहाल करुन खून करणारं. वाचूयात तर मग हे झाड खून नक्की   करतं कसा आणि हा खून विनाकारण आहे असं संशोधकांचं म्हणणं का आहे? या झाडाला शेंगा लागतात. या शेंगेच्या एका बाजूस हुकासारखा भाग असतो आणि त्या भलत्याच चिकट असतात. अर्थातच, या शेंगा पक्ष्यांच्या अंगाला चिकटतात. याप्रकारे इतक्या शेंगा पक्ष्यांना चिकटतात की त्यांना उडणं अवघड होऊन बसतं आणि जड होऊन ते खाली पडतात. मग साधारणतः पक्षी या पिसोनिया झाडातच अडकतात किंवा त्याच्या बुंध्याशी येऊन पोचतात. तिथंच ते पक्षी मरुन जातात. यामुळंच या झाडाला बर्डकॅचर म्हणजेच पक्षी पकडणारे असंही म्हटलं जातं. बरं, असं करुन पक्ष्यांना शेंगांमध्ये गुरफटून टाकणारं हे काही जगात एकच झाड नाही, पण जितक्या जलद गतीनं या शेंगा पक्ष्यांना चिकटतात, त्याचा वेग मात्र इतर झाडांपेक्षा भलताच जलद असतो. फक्त तो पक्षी या झाडाजवळून गेला किंवा त्या शेंगांमध्येच पडला तरी या शेंगांचे हुक्स पटकन त्यांच्या शरीरात अडकतात. यात जर तो पक्षी लहान असेल तर तो शक्यतो मरतोच. मोठा असेल तर थोडाफार दूरपर्यंत जाऊ तरी शकतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महिलां विरोधातील टिप्पणी महागात पडणार!

महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठी लाडला भाऊ योजना सुरू केली, माहिती जाणून घ्या

माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आज 97वर्षांचे झाले.पंतप्रधान मोदी माजी राष्ट्रपती कोविंद यांनी दिल्या शुभेच्छा

भाजपच्या पोस्टरवरून एकनाथ शिंदे गायब, कांग्रेसने लगावला टोला

20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी शेअर मार्केट बंद राहील

पुढील लेख
Show comments