Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Viral Video: पाकिस्तानमध्ये जेसीबीमध्ये अनोख्या पद्धतीने मिरवणूक काढली

Viral Video: Unique procession in JCB in Pakistan
, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (12:40 IST)
आजकाल शहरापासून गावापर्यंत लग्नांची जोरदार चर्चा आहे. लग्नाचा प्रसंग कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच येतो. तरुण पुरुष आणि स्त्रियांना त्यांचे लग्न संस्मरणीय बनवायचे आहे. लग्न आयुष्यभर अविस्मरणीय बनवण्यासाठी जोडपे शक्य ते सर्व करतात. वैवाहिक जीवनातही काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला जातो. आत्तापर्यंत तुम्ही वरात महागड्या कारमध्ये, घोड्यावर, सजवलेल्या वॅगन किंवा हेलिकॉप्टरवर स्वार होऊन मिरवणुकीला जाताना पाहिले असेल. पण आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत जे तुम्ही आधी ऐकले नसेल.
 
पाकिस्तानातील लग्नाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पाकिस्तानातील हुंझा व्हॅली परिसरातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओच चक्क नवरा नवरीची वरात ही ही जेसीबीच्या फाळक्यात बसून काढली गेली आहे.
 
लग्नानंतर नवरीला घेऊन जाण्यासाठी लोक आलिशान गाड्यांचा वापर करतं तर कोणी शाही रथ आणतं पण पाकिस्तानच्या या नवरदेवाने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला. जेसीबीला विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं, त्यात डीजेही व्यवस्था देखील करण्यात आली. आणखी विशेष म्हणजे नवरा नवरीला थेट जेसीबीच्या फाळक्यात उभं करण्यात आलं. वरातात वऱ्हाडी मंडळी नाचत गाजत चालत होती. हे जोडपं सर्वांचं अभिवादन करत होतं.
 
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा मजेदार व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चीनची 38 लढाऊ विमानं हवाई हद्दीत घुसल्याचा तैवानचा दावा