आगामी काळात ताजमहालाला भेट देणे महाग असू शकते. आग्रा विकास प्राधिकरणाच्या बोर्डाच्या बैठकीत ताजमहालाच्या तिकीट दराच्या प्रलंबित प्रस्तावावर चर्चा झाली.
एसडीए चे सचिव राजेंद्र प्रसाद त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, प्राधिकरणाने ताजमहालाच्या टोल टॅक्स वाढविण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला असून, शासनाने हा प्रस्ताव पास केल्यास ताजमहालाच्या तिकीट दरात 1 एप्रिल पासून वाढ होण्याची शक्यता आहे.
ताजमहालासाठी सध्या प्रवेश शुल्क भारतीय पर्यटकांसाठी 50 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 1100 रुपये आहे.
शाहजहाँ आणि मुमताजची कब्र बघण्यासाठी पर्यटकांना मुख्य गुमटावर जाण्यासाठी 200 रुपयांचे जास्तीचे तिकीट खरेदी करावे लागतात.
एडीएच्या प्रस्तावावर शिक्का मोर्तब झाल्यानंतर ताजमहालाचे प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 80 रुपये आणि परदेशींसाठी 100 रुपये ते 1200 रुपयापर्यंत वाढेल. एवढेच नव्हे तर आता देशी -परदेशी पर्यटकांना मुख्य गुमटला भेट देण्यासाठी 400 रुपये खर्च करावे लागणार. सरकार ने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतरच हे दर वाढविण्यात येणार आहे.