Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा काय प्रकार, वापरलेल्या मास्क पासून चटई बनवून त्याची विक्री

What kind of it
, मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (15:58 IST)
नांदेडमध्ये वापरलेल्या मास्क पासून चटई बनवून त्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मास्कपासून बनवलेल्या या चटया नांदेड शहरातील रस्त्यांवर विकल्या जात होत्या. याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पथकाने या चटया जप्त केल्या. सर्जिकल मास्क आणि विविध प्रकारच्या मास्क पासून या चटई बनवण्यात आल्या आहेत. छोट्या आकाराच्या ह्या चटया आहेत. वापरलेल्या मास्क पासून ह्या चटया बनवण्यात आल्या असल्याने कोरोना पसरवण्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

पर राज्यातून आलेले काही जण नांदेड शहरातील रस्त्यावर या चटया विकत होते. दिल्ली येथून ह्या चटया आणल्याचे या विक्रेत्यानी पालिकेच्या पथकाला सांगितले. महापालिकेच्या पठाकाने आय टी आय चौकातील 2 विक्रेत्याकडून या चटया जप्त केल्या आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगावासह काही भागात १६ व १७ ऑक्टोबरला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची शक्यता