Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता,उकळत्या पाण्यात मुलाने समाधी घेतली व्हिडीओ व्हायरल

What to say
, शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (15:13 IST)
सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक मुलगा उकळत्या पाण्याच्या कढईत बसलेला आहे.हा व्हिडिओ बघायला इतका धोकादायक दिसत आहे की ते पाहिल्यानंतर लोक घाबरले. एवढेच नाही तर लोकांनी त्याचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना संपूर्ण सत्य कळू शकले नाही. जरी काही लोकांनी याला बनावट देखील म्हटले आहे, परंतु व्हिडिओमध्ये जे काही दिसते ते खूप भयानक दिसत आहे.
 
हा व्हिडिओ एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे .हे शेअर करत युजरने लिहिले की हा 2021 चा भारत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक मुलगा उकळत्या पाण्यात ध्यान लावून बसला आहे आणि हे पाणी एका मोठ्या कढईत भरले आहे.कढईच्या तळाशी लाकूड खूप वेगाने जाळले जात आहे.त्या मुलाच्या आजूबाजूलाही मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहे,ते सगळे त्या मुलाकडे आश्चर्याने बघत असतात.
 
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक मुलाचे कौतुक करत आहेत तर काहीजण आश्चर्यचकित आहेत. मुलगा उकळत्या पाण्यात हात जोडून आरामात बसून,तो काही मंत्राचा जाप करताना दिसत आहे.पाण्यात त्याच्या सभोवताली फुले दिसतात आणि पातेल्या मधील पाणी उच्च वेगाने उकळले जात आहे.आजूबाजूचे लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत आहेत.पण मुलावर कोणताही परिणाम होत नाही.
 
सध्या, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रियांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. लोक यावर जोरदार टीका करत आहेत. एका वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या वृत्तानुसार,हा व्हिडिओ 2019 मध्ये देखील व्हायरल झाला होता आणि आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. त्या वेळी कोणीतरी हा व्हिडिओ अपलोड केला होता,असेही अहवालात नमूद केले आहे.
 
काही लोक या व्हिडिओबद्दल वैज्ञानिक तर्क देखील देत आहेत की गरम पाणी मुलापर्यंत पोहोचत नाही.त्याच बरोबर काही जण या मुलाला भक्त प्रल्हाद सारखे सांगत आहेत.काहींनी असेही सांगितले की आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी मुलाला हे करण्यापासून रोखले पाहिजे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्राझील-अर्जेंटिना फिफा विश्वचषक पात्रता सामना कोरोना प्रोटोकॉल भंग केल्यामुळे रद्द झाला