Festival Posters

नेटवर्क नसले तरी वायफायने कॉल करता येणार !

Webdunia
शनिवार, 23 जून 2018 (13:15 IST)
मोबाईल नेटवर्क अचानक गायब झाल्यानंतर कॉल करण्याची मोठी अडचण होते. आता वायफाय आपली ही समस्या दूर करु करणार आहे. कारण, लवकरच वायफायच्या मदतीने मोबाईलला नेटवर्क नसतानाही फोन कॉल करता येणार आहे.
 
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, दूरसंचार खात्याने दूरसंचार सेवा पुरवठ्याबाबतच्या परवान्यात काही बदल केले आहेत. ज्यामुळे कंपनीला सेल्युलर सर्व्हिस आणि इंटरनेट टेलीफोनी सर्व्हिस या दोंन्हीसाठीही एकच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे.
 
ग्राहकांना इंटरनेट टेलीफोनीसाठीच्या वापरासाठी एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. हे अॅप ग्राहकांना त्यांची टेलीकॉम कंपनीच उपलब्ध करून देईल. त्यामुळे तुमच्याकडे ज्या कंपनीचे सिमकार्ड असेल त्याच कंपनीचा टेलीफोनी मिळेल. सिमकार्डबरोबर लिंक असणारा नंबरच तुम्ही वापरु शकाल.
 
ग्राहक दुसऱ्या कंपनीचेही टेलीफोनी अॅप डाऊनलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरसारखाच एक दहा अंकी नंबऱ मिळेल, ज्याचा कॉल करण्यासाठी तुम्ही वापर करु शकाल. खराब नेटवर्क आणि कॉल ड्रॉपचा फटका बसणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ‘ट्राय’ने ही शिफारस केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा मोठा विजय

लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेत धर्मांतर विरोधी विधेयक सादर

किरण जॉर्जचा स्विस ओपनमधील प्रवास प्री-क्वार्टर फायनलमध्ये संपला

शिर्डीतील साईबाबांच्या भक्तांना एलपीजीचा फटका, लाखो भाविक प्रसादाशिवाय परतले!

पीएम किसान योजना : शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची भेट मिळाली

पुढील लेख
Show comments