Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

व्हेज माहित आहे मात्र यापुढचे वेगन डायेट म्हणजे काय आहे

व्हेज माहित आहे मात्र यापुढचे वेगन डायेट म्हणजे काय आहे
, गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (15:09 IST)
आपल्या देशात प्रामुख्याने अनेक नागरिक व्हेज जेवण करतात, व्हेज शाकाहारी म्हणजे काय हे सर्वाना माहित आहे. मात्र जगात आता यापुढचा वेगन खाद्य प्रकार समोर येतो आहे. तर 1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा होतो. वेगन मध्ये फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा समावेश होतो. महत्त्वाची बाब अशी की वेगन डाएटमध्ये दूध, दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खात नाहीत. कारण म्हणजे गायीपासून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी तिला खाण्यासाठी, पिण्यासाठी जेवढं पाणी दिलं जात नाही त्यापेक्षा जास्त पाणी तिला खाण्यासाठी लागणारा चारा उगवण्यासाठी वापरण्यात येतं. त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे दुधाचे पदार्थ खात नाहीत. सोबतच प्राण्यांपासून मिळणारं मांस, दूधापासून तयार करण्यात येणारा कोणताही पदार्थ खाण्यास मनाई आहे. जर तुम्ही तुमच्या डाएटमधून मांस, दूध आणि अंडी पूर्णपणे काढून टाकत असाल तर तुम्हाला त्यांची कमतरता भरून काढण्यासाठी डाएटमध्ये फळ, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स  यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा लागणार आहे.
 
व्होल व्हीट वेगन डाएट : यामध्ये फळं, भाज्या, डाळ, ड्रायफ्रुट्सचा समावेश करण्यात येतो. 
 
रॉ फूड वेगन डाएट : या श्रेणीमध्ये कच्ची फळं, भाज्या, ड्रायफ्रुट्स किंवा वनस्पतींपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश करण्यात येतो. 
 
थ्राइव डाइट : या डाएटमध्ये व्होल व्हीट आणि रॉ फूड या दोन्ही पदार्थांचा समावेश करण्यात येतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सकल मराठा क्रांती मोर्चाकडून विविध आंदोलनांची घोषणा