महाराष्ट्रातील नागपूरसह संपूर्ण विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी खूपच कमी होती. दरम्यान, असे एक प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. प्रत्यक्षात, जेव्हा एक व्यक्ती मतदान करण्यासाठी येथे पोहोचला तेव्हा त्याला सांगण्यात आले की मतदार यादीनुसार त्याचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्याला मतदान करता आले नाही.
महाराष्ट्रातील नागपुरात एका व्यक्तीला मतदान करता आले नाही कारण तो मतदान करण्यासाठी तिथे पोहोचला तेव्हा त्याला मतदार यादीनुसार मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तर हा व्यक्ती जिवंत असल्याचे सर्व पुरावे देत राहिला.
या व्यक्तीला मतदार यादीत मृत घोषित करण्यात आले होते. सदर व्यक्ती मतदान केंद्रावर पोहोचला असता त्याला यादीनुसार तो मृत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी डीएम कार्यालयाशी संपर्क साधला त्यावर अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालणार असे सांगण्यात आले. कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असावा आम्ही सध्या काही करू शकत नाही. पुढच्या वेळी अपडेट करा असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या व्यक्तीने सांगितले की, 2018 मध्ये त्याच्या भावाचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे नाव देखील भावासह काढून टाकण्यात आले. मी मतदार केंद्रावर स्वतः जिवंत असल्याचं आरडा ओरड करत होतो. माझ्या कडील ओळखपत्र आणि मतदार कार्ड ही दाखवले मात्र माझे नाव यादीतून वगळून टाकल्यामुळे मला मतदान करता आले नाही. यावेळी त्यांना मतदान करता आले नाही. याबद्दल ते खूप निराश झाले आहे.