Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाखाली पक्ष स्थापन करून काळा पैसा कमविला! मुंबईतून निवडणुकीत या पक्षाचे तीन उमेदवार

Webdunia
सोमवार, 6 मे 2024 (18:09 IST)
सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक हा लोकशाहीचा महान सण मानला जात असला तरीही काही लोकांनी याला काळा पैसा कमावण्याचा धंदा बनवला आहे. आता लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा नावाखाली पक्षाची स्थापना करून निवडणूक लढवत आहे. 

या पक्षाकडून मुंबईतून 3 उमेदवार निवडणूक लढवत आहे. हा पक्ष नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष आहे.
निवडणूक आयोगाने 2022  मध्ये सरदार वल्लभभाई पटेल पक्ष(SVPP) समवेत अशा 200 पक्षांची चौकशी केली होती या पक्षांवर कर करचुकवेगिरीचे आरोप होते. आणि त्यात धक्कादायक खुलासे झाले. ज्या पक्षाचे नाव माहीत नाही अशा पक्षाकडून देणग्या म्हणून 55.5 कोटी मिळाले.
अशा राजकीय पक्षांवर त्यांच्या ग्राहकाकडून देणगीच्या स्वरूपात पैसे गोळा करतात आणि कमिशन कापून उर्वरित रक्कम परत देतात. 

या पक्षावर 2022 मध्ये आयकर विभागाने धाड टाकल्यावर या पक्ष कडे देणगीच्या स्वरूपात 55.5 कोटी रुपये आढळले. 2014 साली आयकर विभागाने ही माहिती निवडणूक आयोगाला सादर केली होती.
 
या वेळी मुंबईत सरदार वल्लभभाई पक्षाकडून अर्ज दाखल केलेल्या तीन उमेदवारांकडे निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार तिघांकडे कोणतेही वाहन नाही, दोघांकडे स्वतःचे घर देखील नाही आणि त्यांचे उत्पन्न शून्य असल्याचे सांगण्यात आले आहे. 
या पक्षाचे उमेदवार कमलेश व्यास मुंबईतील बोरिवली हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला कमलेश  मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याचे  माहित नाही. 
 तर दुसरे उमेदवार महेश सावंत हे सरदार वल्लभभाई पटेल पक्षाकडून दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढवत आहे.
या पक्षाचे तिसरे उमेदवार भवानी चौधरी हे उत्तर पूर्व मुंबईतून निवडणूक लढवत आहे. 
पक्षाचे कमलेश व्यास म्हणाले आम्ही पक्षाशी निगडित आयटी प्रकरणावर काही बोलू शकत नाही कारण ते त्यात तज्ञ नाही. 

पक्षाने निवडणूक आयोगाला 2022 मध्ये देणगी म्हणून मिळालेले 55.5 कोटी रुपये विविध कामांवर खर्च केल्याचे सांगितले होते. त्याच्या दाव्यानुसार, शिक्षणावर 10 कोटी रुपये, जेवणावर 15 कोटी रुपये, उबदार हिवाळ्यातील कपड्यांवर 16 कोटी रुपये आणि गरिबांना दिलासा देण्यासाठी 11 कोटी रुपये खर्च केले आहेत.
पक्षाचे कार्यालय अशा ठिकाणी आहे. हे बोरिवली पूर्वेतील एका चाळीतील फोटोकॉपी सेंटरमधून  सुरू आहे.
 
Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Key candidates महाराष्ट्र निवडणूक 2024 चे प्रमुख उमेदवार

बुलढाणा : विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने राहुल गांधींची निवडणूक रॅली रद्द

नाना पटोले यांच्या 'कुत्रा' वक्तव्यावर भाजपच्या अनुराग ठाकूरचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रात "मोठ्या प्रमाणात पैसे वाटप" झाल्याचा संजय राऊत यांचा आरोप

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी भाजप काय करत आहे, काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना सवाल

पुढील लेख
Show comments