महाराष्ट्रात सध्या प्रचंड उकाडा आहे. ज्याचा परिणाम निवडणुकीवरही दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जागा असलेल्या नागपूरसह विदर्भातील पाच जागांवर सरासरी 61.06 टक्के मतदान झाले. त्यापैकी सर्वात कमी मतदान नागपुरात झाले. शुक्रवारी मतदानादरम्यान पाचही जिल्ह्यांतील तापमान 40 ते 43 अंशांच्या दरम्यान होते. सर्वाधिक 70 टक्के मतदान गडचिरोलीत झाले.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, नागपूर लोकसभा मतदारसंघात 54.46%, रामटेक 59.58%, चंद्रपूर 63.7%, भंडारा गोंदिया 64.73% आणि गडचिरोली मतदारसंघात 70.83% मतदान झाले. कडक उन्हामुळे मतदानासाठी लोक कमी आले. काल मतदान झालेल्या सर्व भागात तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. कडक उन्हामुळे सकाळी मतदान केंद्रांवर मोठी गर्दी दिसून आली. मात्र दुपारपर्यंत मतदान केंद्रे सुनसान होती. चंद्रपूरचे तापमान 43.8 अंश सेल्सिअस होते, तर नागपूरचे तापमान 41.4 अंश सेल्सिअस होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदार यादीत नावं नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याच्या काही तक्रारी मतदान केंद्रांवर आल्या होत्या. आपले नाव शोधण्यासाठी लोक इकडे तिकडे भटकत राहिले.