Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

नितीन गडकरींना पुसद सभेत आली भोवळ, अंगरक्षकांनी सावरले

nitin gadkari
, बुधवार, 24 एप्रिल 2024 (17:04 IST)
यवतमाळ येथे जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. वेळीच व्यासपीठावरील काही लोकांनी आणि अंगरक्षकांनी त्यांना सावरले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. तसेच सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. प्रचारा दरम्यान उन्हाचे चटके जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना देखील चक्कर आली होती. आता नितीन गडकरी यांना  सभेत भोवळ आली.

नितीन गडकरी हे आज यवतमाळ लोकसभा मतदार संघातून शिंदे गट शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील उमेदवार म्हणून उभ्या आहे. त्यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी मैदानावर आज महायुतीच्या जाहीर सभेसाठी उपस्थित होते. 

गडकरी यांना भोवळ आल्यावर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना वेळीच सावरलं अन्यथा ते जमिनीवर कोसळले असते. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. गडकरी यांना तातडीनं उपचारासाठी नेले .  
काही वेळानंतर गडकरी यांनी x वर पोस्ट करून सांगितले की, त्यांना उष्णतेमुळे अस्वस्थ वाटत होते. आता ते पूर्णपणे स्वस्थ आहे. 


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. नागपूरच्या जागेवर पहिल्या टप्प्यात मतदान झाले आहे. येथे गडकरींचा सामना काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याशी आहे. 

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gold Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर कमी झाले, जाणून घ्या आजचे दर