Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात 29 एप्रिल रोजी महाविजय संकल्प’ सभा

Webdunia
शनिवार, 27 एप्रिल 2024 (21:27 IST)
सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा होत आहे. प्रत्येक पक्ष एकमेकांवर शाब्दिक बाणांचे हल्ले करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची  पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या 29 एप्रिल रोजी महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा वानवडी येथील रेसकोर्स मैदान येथे सायंकाळी 5:30 वाजता होणार आहे. या सभेला महायुतीचे  सुमारे 2 लाख कार्यकर्त्ये उपस्थित राहणार अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली. 

पांडे म्हणाले, पुण्यात अनेक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रेसकोर्स रोड येथे होणार आहे. ही सभा 128 एकर मध्ये होणार आहे. 21 विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्त्ये या सभेसाठी येणार.या सभेच्या माध्यमातून महायुतीतील चारही उमेदवारांची महाविजय संकल्प सभा असणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आणि 3 हजार व्हीआयपी या सभेला उपस्थित राहणार. 
या सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याची सोय देखील असणार आहे. 
 
Edited By- Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

RCB vs KKR Playing-11: आरसीबी-केकेआर सामन्याने लीग पुन्हा सुरू होणार, प्लेइंग 11जाणून घ्या

World Telecommunication Day 2025 : जागतिक दूरसंचार दिन कधी आणि कसा सुरू झाला इतिहास, उद्दिष्टये जाणून घ्या

World Hypertension Day 2025 : जागतिक उच्च रक्तदाब दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, जाणून घ्या २१ मे पर्यंत महाराष्ट्रात हवामान कसे राहील?

Doha Diamond League : नीरज चोप्राने 90 मीटरचा टप्पा ओलांडला,कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो फेकला

पुढील लेख
Show comments