संजय निरुपम यांनी काँग्रेसला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहे या मुळे मी या पक्षात प्रवेश केला आहे. असं संजय निरुपम म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. संजय हे पूर्वी शिवसेनेतच होते मात्र त्यांनी 2005 मध्ये शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसच्या पक्षात प्रवेश केला आता त्यांची पुन्हा घरवापसी झाली असून आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या वेळी ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी माझी चर्चा एकनाथ शिंदे यांच्या सोबत झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत येण्याचं म्हटलं होत. आता शिवसेनेला मजबूत करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करत आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले संजय निरुपम यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी, मुलगी आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
संजय निरुपमआज स्वगृही परतले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संजय निरुपम यांना राज्यसभेवर पाठवलं होत. उमेदवार पक्षात येताना कोणते पक्ष मिळणार अशी विचारणा करतात मात्र संजय निरुपम यांनी अशी काहीही मागणी केली नाही. तर मला जी जबाबदारी द्याल ती मी पूर्ण करेन.असं ते म्हणाले. संजय निरुपम यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडली आणि काँग्रेस पक्षात शामिल झाले. संजय निरुपम 2009 च्या लोकसभा निवडणुकीतून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडून आले. त्यांनी 2009 ते 2014 या कालावधीत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.