Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Anniversary Wishes in Marathi for Friend मित्र-मैत्रीणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

Anniversary wishes in marathi for friend
, शनिवार, 19 एप्रिल 2025 (13:26 IST)
तुमची जोडी सदा राहो अशीच कायम
जीवनात असो भरपूर प्रेम
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण
हीच आहे सदिच्छा वारंवार 
 
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन
जन्मभर राहो असंच कायम
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम 
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी खूप छान
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले
आज वर्षपूर्तींनंतर आठवताना मन आनंदाने भरलेले
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुम्ही दोघं एकमेकांबरोबर खूप छान दिसता 
मेड फॉर इच अदर वाटता
तुम्हाला दोघांना खूप प्रेम आणि आनंद मिळो
हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी
 
जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा 
तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
 
घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
 
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
आपसात भरपूर प्रेम असावं.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा,
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे.
हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष अखंड साजरा होत राहो
हीच मनी आहे एकमेव इच्छा
 
तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय
जे आयुष्यात आनंद भरतात
तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर
हॅपी अॅनिव्हर्सरी माय ब्रदर
ALSO READ: Anniversary Wishes For Wife In Marathi पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ईश्वर करो तुमचं नातं गाठो आकाशाची उंची,
येणारं आयुष्य असो सुखमय, घरात राहो आनंदाचा वास,
सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास
हॅपी अॅनिव्हर्सरी
 
साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो
हॅपी अॅनिव्हर्सरी
 
शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा
प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा
प्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा
प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं
लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो
 
तुम्ही दोघं दिसता सोबत छान
असंच एकमेकांवर प्रेम करा आणि
आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा
हॅपी अॅनिव्हर्सरी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Summer Special Recipe नक्की ट्राय करा मँगो रबडी