Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

'पिप्सी'चा रंजक प्रवास लवकरच

'पिप्सी'चा रंजक प्रवास लवकरच
, बुधवार, 20 जून 2018 (12:08 IST)
लॅन्डमार्क फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित होत असलेला 'पिप्सी' हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. राज्य पुरस्कारप्राप्त बालकलाकार मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या छोट्या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर मुख्य पोस्टर लाँच करण्यात आला. या सिनेमाच्या पोस्टरवर ट्रेनच्या खिडकीतून दोन शाळकरी मुले बाहेर हात हलवताना दिसून येत असून, ही दोघेजण कुठल्यातरी प्रवासाला किंवा एखाद्या सहलीला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवाय या पोस्टरवर 'अ बॉटल फूल ऑफ हॉप' ही टॅगलाईनदेखील दिली असल्यामुळे, या दोन मुलांच्या आयुष्यात 'पिप्सी'ची ही बाटली कोणता आनंद घेऊन येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
'पिप्सी' चा हा पोस्टर लहान मुलांच्या भावविश्वाचा रंजक वेध घेणारा ठरत आहे. गावातल्या लहान मुलांच्या आवडत्या शीतपेयापैकी एक असलेल्या या 'पिप्सी' चा नेमका कोणता संदर्भ चित्रपटात मांडला आहे, हे जाणून घ्यायचे असेल, तर सिनेमा प्रदर्शनापर्यंत प्रेक्षकांना वाट पहावी लागणार आहे.

विधि कासलीवाल यांची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या 'पिप्सी' या सिनेमात लहान मुलांच्या मानसिकतेचा आणि समाजातील समस्येकडे पाहण्याचा त्यांचा असलेला दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये लहानपणीच्या निरागस मैत्रीचा रंजक प्रवासदेखील प्रेक्षकांना घडून येणार असल्यामुळे, प्रत्येकांना हा सिनेमा आपल्या बालपणाची आठवणदेखील करून देणारा ठरणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ड्राय डे' घेऊन येतोय ब्रेकअप नंतरची धम्माल (Video)