Article M Arathi Film Preview %e0%a4%b5%e0%a4%b3%e0%a5%82 %e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be %e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%ad%e0%a4%b0 %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9a%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0 107121400009_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

`वळू` आता जगभर पोहोचणार

`वळू` आता जगभर पोहोचणार
श्वास या चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीने नवा श्वास घेतला असून अनेक दर्जेदार चित्रपट तयार होत आहेत. विशेष म्हणजे व्यावसायिक व वेगळे प्रयोग करणारे चित्रपटही यात आहेत. त्यातही व्यावसायिकतेचे भान जपले जात आहेत. आता उमेश कुलकर्णी दिग्दर्शित वळू हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येत असून, त्याच्या जगभरातील वितरणाचे हक्क व निगेटिव्ह हक्क हिंदी चित्रसृष्टीत दबदबा असलेल्या मुक्ता आर्ट्सने घेतले आहेत.

webdunia
IFMIFM
हा चित्रपट अगदी वेगळा असून यातील नायक वळू हाच आहे. मोकाट सुटलेल्या झपाटलेल्या बैलास पकडण्याचा प्रवास चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. या वळूला पक़डण्याच्या प्रयत्नात अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, गिरीश कुलकर्णी, निर्मिती सावंत हे बडे कलावंत सामील झाले आहेत.

अंटार्क्टिक फिल्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगेश धाकडे यांनी चित्रपटास संगीत दिले आहे. मुक्ता आर्ट्सने या चित्रपटाचे हक्क विकत घेऊन यातून मराठी चित्रपटांप्रती बांधिलकी स्पष्ट केली आहे.

उमेश कुलकर्णी या तरूण दिग्दर्शकाचा 'वळू' हा पहिलाच चित्रपट असून त्याची निर्मितीमुल्ये उच्च दर्जाची आहेत.
webdunia
मुक्ता आर्ट्सने यापूर्वीच 'कांदा पोहे' या मराठी चित्रपटाची निर्मिती हाती घेतली आहे. सावरखेड एक गावचे दिग्दर्शक राजीव पाटील हेच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत. निर्माता श्रेयस तळपदे आहे. कांदा पोहे मध्ये शिल्पा तुळसकर, तुषार दळवी व सुबोध भावे हे कलावंत आहेत.

webdunia
IFMIFM
सुभाष घईंची संपूर्ण कारकीर्द महाराष्ट्रात घडली आहे. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, या महाराष्ट्राच्या ऋणातून मुक्त होण्याच्या भावनेतून आपण मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे योगदान देत आहोत. त्यादृष्टीने मुक्ता आर्ट्सचे हे पहिले पाऊल असून यापुढेही नवीन प्रतिभेस वाव देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहु. उमेश कुलकर्णी या तरूण दिग्दर्शकाचा 'वळू' हा पहिलाच चित्रपट असून त्याची निर्मितीमुल्ये उच्च दर्जाची आहेत. यातून चित्रपटसृष्टीतील तरूण प्रतिभेचे दर्शन घडत असून मुक्ता आर्टस तरूण प्रतिभेस वाव देण्यासाठी वचनबद्ध आहे.

दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी समाधान व्यक्त करताना मुक्ता आर्ट्सच्या बॅनरअंतर्गत चित्रपटाची दृष्यात्मकता ठळक होण्याबाबत विश्वास व्यक्त केला. यामुळे आपणांस दुसर्या प्रकल्पाकडे लक्ष देण्यास निश्चितच वेळ मिळेल. याचबरोबर मुक्ता आर्टससारख्या चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठा असलेल्या संस्थेमुळे चित्रपट सर्व स्तरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल, याबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi