महाराष्ट्रात एका टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहे तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज महाराष्ट्र निवडणूक 2024 साठी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.या वेळी त्यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी लता शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे, वडील संभाजी शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश, आमदार प्रताप सरनाईक, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार रवींद्र फाटक हे उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्ये उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे केदार दिघे हे निवडणूक लढणार आहे.
<
Maharashtra CM and Shiv Sena chief Eknath Shinde files his nomination today from Kopri-Pachpakhadi Assembly constituency, for #MaharashtraElection2024.
— ANI (@ANI) October 28, 2024
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ठाणे नेहमीच भगवे होते आणि ते असेच राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दाखल केली असून ते विक्रमी मतांनी निवडणूक जिंकणार.