Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

विचारधारेच्या विरोधात गेले....एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

विचारधारेच्या विरोधात गेले....एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
, शनिवार, 2 नोव्हेंबर 2024 (14:11 IST)
विधानसभेच्या या निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकच गट म्हणजे महायुती. तर विरोधकांकडून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले महाविकास आघाडी हे त्रिकूट जोरदार प्रभाव पाडत असून आता हे दोन्ही गट एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहे आणि वक्तव्य करत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार शिंदे म्हणाले की, यांनी उद्धव ठाकरे विचारधारेच्या विरोधात गेले, त्यामुळे त्यांचे सरकार उलटले. उद्धव ठाकरेंना खूप समजावलं, पण वैयक्तिक स्वार्थ आणि आसक्तीच्या जाळ्यात ते अडकले. तसेच मुख्यमंत्री होण्याच्या हव्यासापोटी उद्धव यांनी कोणाचेही न ऐकता बाळासाहेब ठाकरे ज्या काँग्रेसविरुद्ध नेहमीच लढले त्या काँग्रेससोबत गेले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना खूप समजावले. 
 
तसेच महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना-भाजपचे युतीचे सरकार हवे आहे आणि शिवसेनेने भाजप युतीचे सरकार स्थापन केले. गेल्या 2 वर्षात आम्ही जनतेसाठी काम केले आणि शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन केले. गेल्या 2 वर्षात आम्ही जनतेसाठी काम केले.

Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक : नातवाने केला वृद्ध आजीवर लैंगिक अत्याचार