Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपला राम राम, शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

Webdunia
सोमवार, 7 ऑक्टोबर 2024 (15:29 IST)
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी भाजपच्या पक्षाला राम राम करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (एसपी) प्रवेश करण्यात आला. या वेळी हर्षवर्धन म्हणाले की, त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे की त्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इंदापूर जिल्हा पुणे मतदारसंघातून निवडणूक लढवावी.त्यांनी इथून पूर्वी प्रतिनिधित्व केले आहे. हर्षवर्धन पाटील हे सध्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आहेत.

शुक्रवारी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली. त्यांनी गुरुवारी शरद पवारांची भेट मुंबईतील सिल्वर ऑक्स येथे घेतली होती. या वेळी शरद पवारांनी मला त्यांच्या पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. पुढील महिन्यांत विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. 
 
हर्षवर्धन पाटील यांनी 1995-99 दरम्यान शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये कृषी आणि पणन राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. 1999 ते 2014 या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते मंत्री होते. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सहकार आणि संसदीय कामकाज मंत्री बनले.
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments