महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंधरा उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी एकट्याने विधानसभा निवडणूक लढवत आहे.
पक्षाने पनवेलमधून योगेश जनार्दन चिले, खामगावमधून शिवशंकर लगर, अक्कलकोटमधून मल्लिनाथ पाटील, सोलापूर शहर मध्यमधून नागेश पासकांती यांना उमेदवारी दिली आहे.
तर जळगाव जामोदमधून अमित देशमुख, मेहकरमधून भय्यासाहेब पाटील, गंगाखेडमधून रूपेश देशमुख, उमरेडमधून शेखर तुंडे, फुलंब्रीतून बाळासाहेब पाथ्रीकर, परंडामधून राजेंद्र गपत, उस्मानाबाद (धाराशिव)मधून देवदत्त मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर काटोलमधून सागर दुधाणे, बीडमधून सोमेश्वर कदम, श्रीवर्धनमधून फैजल पोपेरे आणि राधानगरीतून युवराज येड्डेरे यांना तिकीट देण्यात आले आहे. 22 ऑक्टोबर रोजी मनसेने 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती.
या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर बुधवारी 12 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राज्यात 288 जागांसाठी पुढील महिन्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तीन दिवसांनंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.