Publish Date: Thu, 07 Nov 2024 (11:03 IST)
Updated Date: Thu, 07 Nov 2024 (11:06 IST)
एआयएमआयएम चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, बाबा सिद्दीकी यांची हत्या का झाली याचे उत्तर कोणाकडे नाही.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील धुळ्यातील एआयएमआयएमचे उमेदवार फारुख शाह यांच्या समर्थनार्थ रॅलीला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना बाबा सिद्दीकी यांची हत्या कशी झाली, असा प्रश्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार ओवेसी म्हणाले की, बाबा सिद्दिकीची हत्या झाली, गोळ्या झाडल्या, महाराष्ट्रात काय चाललंय, तीन वेळा आमदार राहिलेल्याला 6 वेळा गोळ्या घातल्या. बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू कसा झाला हे पंतप्रधान मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे. बाबा सिद्दीकी तुमच्या पक्षाचे आहे, तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला वाचवू शकत नसाल तर स्वत:ला कसे वाचवाल असा सवाल ओवेसी यांनी अजित पवारांना केला.