Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

वन नेशन वन इलेक्शनवर संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला

sanjay raut
, शनिवार, 17 ऑगस्ट 2024 (15:52 IST)
शिवसेना युबीटीचे नेते संजय राऊतांनी वन नेशन वन इलेक्शन वर टोमणा लगावत म्हटले. चार राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका घेऊ शकत नाही. आणि वन नेशन वन इलेक्शनचे म्हणतात. महायुतीचा पराभव होणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. आमच्या पंतप्रधानांनी निवडणुका पुढे ढकलल्या. त्यांच्यासाठी महाराष्ट्र आणि झारखंड महत्त्वाचे नाही. 
 
संजय राऊत म्हणाले, 'आपले पंतप्रधान 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून वन नेशन वन इलेक्शनची चर्चा करायचे, पण चार राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होऊ शकत नाहीत.या साठी कारणं देत आहे, सण आहे, पाऊस आहे. हे सर्व त्यांचे बहाणे आहे.एकाच वेळी चार राज्यात निवडणूक घेता येत नाही आणि  वन नेशन वन इलेक्शनच्या मोठ्या गोष्टी करतात.हीच तुमची ताकद आहे? खोटे बोलतात. 
 
हरियाणा आणि जम्मूकाश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे. जम्मू काश्मीर मध्ये तीन टप्प्यात निवडणूक मतदान होणार आहे हरियाणामध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. 
Edited by - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्मार्ट वॉचने Heart Rate मोजताना या 7 चुका करु नका, ताण वाढेल