Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 2 नेत्यांवर दगडफेक, डोक्याला दुखापत

Webdunia
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2024 (17:03 IST)
Maharashtra Election 2024: उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार आहे. या पूर्वी सोमवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला करण्यात आला. या मध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली असून सोमवारीच सांयकाळी आणखी एका नेतावर हल्ला करण्यात आला.

छत्रपती संभाजी नगर येथील गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष चे उमेदवार सुरेश सोनावणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून सोनावणे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 
सदर घटनाला वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लांजी गावात अज्ञाताने दगडफेक केली. ही घटना सायंकाळी

7:30 वाजेच्या सुमारास घडली. सोनावणे यांना डोक्याला किरकोळ  दुखापत झाली असून त्यांना तातडीने मदत देण्यात आली.याआधी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. दगडफेकीत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. हा हल्ला कोणी केला याबाबत माहिती मिळू शकली नाही.  हा हल्ला कोणी केला आणि का केला याचा तपास पोलीस करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

LIVE: ऑपरेशन सिंदूरवर एकनाथ शिंदे म्हणाले- आम्ही पाकिस्तानला सोडणार नाही

भारताच्या हल्ल्याने संतप्त पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार 7 जणांचा मृत्यू

नीरज चोप्रा क्लासिक 2025 च्या तिकिटांची विक्री सुरू

सिंधू पाणी करारावर पंतप्रधान मोदींचे मोठे विधान,भारताचे पाणी पूर्वी बाहेर जात असे, आता ते भारताच्या हितासाठी राहील

IND vs PAK: आयसीसी स्पर्धेतही पाकिस्तान सोबत खेळण्यास गंभीरचा विरोध

पुढील लेख
Show comments