Daily Horoscope
✕

महाराष्ट्राची अस्मिता विकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवतात, उद्धव ठाकरेंचा महायुतीवर हल्लाबोल

Webdunia
रविवार, 17 नोव्हेंबर 2024 (09:59 IST)
Uddhav Thackeray Newsआगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात महाविकास आघाडीने आपली ताकद दाखवून दिली. महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारसभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, महाराष्ट्राची अस्मिता विकणारे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे. 
 
दिल्लीत काम करताना महाराष्ट्राच्या सन्मानाशी तडजोड करणारे हेच लोक आहेत. केंद्र सरकारची धोरणे आणि भाजपचे राजकारण हे लोकविरोधी असल्याचे सांगून ते म्हणाले की, महाविकास आघाडीची युती केवळ सत्तेसाठी नाही, तर महाराष्ट्रातील जनतेचे हक्क आणि अस्मिता जपण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे.
 
धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती आहे. धनुष्य आणि बाण आपले होते, आहेत आणि नेहमीच राहतील.

हिसकावण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होईल. निवडणूक आयोगाला केंद्र सरकारची कठपुतली म्हणत हा मुद्दा न्यायालयात नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे पुढे म्हणाले की, हिंदू-मुस्लिम यांच्यात द्वेष पसरवून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आता मराठी विरुद्ध मराठी असा खेळ सुरू केला आहे, मात्र महाराष्ट्रातील जनता असे कारस्थान हाणून पाडेल. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर आपली संस्कृती आणि बंधुता जतन करण्याची आहे.

 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास राज्य परिवहन (एसटी) बसमध्ये महिलांना मोफत सेवा दिली जाईल, असे ते म्हणाले
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात 'ऑपरेशन टायगर-३'ची चर्चा; अनेक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात! संजय शिरसाटांचे मोठे विधान

अवघ्या ३ आठवड्यांत तिसरे चक्रीवादळ! बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ धडकणार; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

IRCTC वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! आता एका मिनिटात बुक होणार २२०० ट्रेनची तिकिटे

५.७४ लाखांच्या 'या' SUV ने गाजवले मार्केट; अवघ्या १० महिन्यांत २ लाखांहून अधिक ग्राहकांची पसंती!

राजकीय भूकंप! रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर शिंदे गटाच्या वाटेवर

पुढील लेख
Show comments