suvichar
✕

Maharashtra Election Result: महाराष्ट्रात निकालापूर्वी पोस्टर लागले, अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार?

Webdunia
शनिवार, 23 नोव्हेंबर 2024 (12:43 IST)
Ajit Pawar News :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आज शनिवारी जाहीर होणार आहे. पण, निकालापूर्वी पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. अजित पवारांना भावी मुख्यमंत्री घोषित करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहे.
 
20 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. आतापासून थोड्याच वेळात निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. मात्र, निकालापूर्वीच राज्यात पोस्टर वॉर सुरू झाले आहे. राष्ट्रवादीच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून वर्णन करून त्यांचे पोस्टर लावले आहे.
 
 
अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या पोस्टरबाबत राष्ट्रवादीचे नेते संतोष नांगरे म्हणाले, "अजितदादा हे महाराष्ट्राचे मास लीडर आहे. त्यांचे काम बोलते. ते जे बोलतात तेच करतात. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते बोलतात. त्यामुळे सर्व "कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे नेते आणि तरुण त्यामुळेच आम्ही हा बॅनर लावला आहे.
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. येथे अजित पवार यांची राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) उमेदवार युगेंद्र पवार यांच्याशी स्पर्धा आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर ३.०' संदर्भात राजकीय हालचाली तीव्र झाल्या

लोणार सरोवर जगातील सर्वात महत्त्वपूर्ण स्थळांपैकी एक बनले; IUGS च्या 'तिसऱ्या १०० भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या' यादीत समावेश

जय शाह यांची सलग दुसऱ्यांदा ICC अध्यक्षपदी निवड; २०२८ ऑलिम्पिकवर राहणार विशेष लक्ष

केवळ चांदीच नाही, तर सोन्याचे दरही गडगडले; भाव १ लाखांच्या खाली येणार?

निवृत्तीच्या अफवांमुळे नितीन गडकरी नाराज; निवृत्तीच्या अफवांना स्वतःच पूर्णविराम दिला

पुढील लेख
Show comments