Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

शरद आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का? काय म्हणाले नवाब मालिक..

nawab malik
, बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (15:23 IST)
Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक येत्या 20नोव्हेंबर रोजी होणार असून मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार विविध मतदार संघातून उभे केले आहे. भाजपचे विरोध असताना राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटातून मानखुर्द मतदारसंघातून नवाब मलिक यांना तिकीट दिले आहे. मालिक यांनी मानखुर्द मतदार संघातून उमेदवारी दाखल केली.

महायुतीमध्ये नवाब मलिकांच्या तिकिटावरून गोंधळ झाला असून नवाब मालिक यांना उमेदवारी बद्दल प्र्श्न विचारले असता ते म्हणाले, कोणत्याही उमेदवाराला 4फॉर्म भरण्याचा अधिकार आहे. मी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणुन निवडणुकीसाठी उभा आहे. नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द मतदार संघातून अबू आजमी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. 
 
नवाब मलिक यांना अजित दादा पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? असा प्र्श्न विचारल्यावर ते म्हणाले, मी तुरुंगात असताना अजित दादा पवार यानी मला आणि माझ्या कुटुंबियांना नेहमीच मदत केली. म्हणुन मी त्यांनी वेगळा पक्ष केल्यावर मी त्यांच्या सोबत आलो. 
शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई सुळे यांच्याशी देखील माझे चांगले संबंध आहे. माझ्या जावयाच्या अपघाता वेळी सुप्रिया ताईंचा फोन आला होता. पवार कुटुंब एकत्र येणार का असा प्र्श्न विचारल्यावर ते म्हणाले कोणतेही कुटुंब तुटू नये अशी सर्वांची इच्छा आहे. हे सर्व घडत असताना मी तुरुंगात होतो . लाठीने पाण्यात मारल्याने पाणी वेगळे होत नाही, लोक लाठी मारत राहतात, कधी कधी पाणी पुन्हा जमा होते.
महाराष्ट्रातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे.कधीतरी पवार कुटुंबीयही एकत्र येण्याची शक्यता आहे.मात्र हा निर्णय पवार साहेब आणि अजित दादांना घ्यायचा आहे.
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांदिवली प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी राजकारण्यांवर निशाणा साधत महाराष्ट्राच्या भवितव्याबद्दल केली चिंता व्यक्त