Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्य सरकारमुळे शेतकरी सूरज जाधवने आत्महत्या केली -देवेंद्र फडणवीस

Farmer Suraj Jadhav committed suicide due to state government - Devendra Fadnavis राज्य सरकारमुळे शेतकरी सूरज जाधवने आत्महत्या केली -देवेंद्र फडणवीस Marathi Budget  News in Webdunia Marathi
, मंगळवार, 8 मार्च 2022 (16:50 IST)
सध्या राज्यात शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडण्यासंदर्भात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उचलला आहे. राज्य सरकार ने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी सूरज जाधव यांनी फेसबुकवर लाईव्ह पोस्ट करून आत्महत्या करण्याची वेळ आली.असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 23 वर्षीय सुरज जाधव यांनी वीज कनेक्शन तोडल्यामुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाची काळजीमुळे आपले आयुष्य संपविले.  
 
सध्या राज्य सरकार च्या काळात विजतोडणीमुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत असून त्यांना अनेक अडचणींना सामोरी जावे लागत आहे. या अडचणींना तोंड देत 23 वर्षीय सुरज जाधव याने फेसबुक लाईव्ह करत या व्हिडीओ मध्ये राज्य सरकारला कारणीभूत ठरवत विष प्राशन करत आत्महत्या केली. 
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणी करू नये आणि त्यांना थोडे पैसे भरण्याची सवलत मे महिन्यापर्यंत दिली असून देखील उपमुख्यमंत्रीच्या या निर्णयाची अंमलबजावणी सरकार कडून अद्याप झालेली नाही. असं वाटत आहे की ही मविआ सरकार शेतकऱ्यांची विरोधी आहे. असे ही फडणवीस म्हणाले.त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,असे टोकाचे पाऊल उचलू नये.    
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाण्यात भंगाराच्या गोदामाला भीषण आग,अग्निशमन दल पथक घटनास्थळी दाखल