आज, गुरुवारपासून सुरुवात झाली. मात्र या अधिवेशनाची सुरूवात वादळी झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषण अर्धवट थांबवलं आहे. आणि सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीनंतर राज्यपालांनी सभागृह सोडलं आहे. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक प्रकरणावरून विरोधी पक्ष भाजप कमालीचा आक्रमक झाला आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यानंतर नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपनं (bjp) लावून धरली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( कमालीचे आक्रमक झाले होते. अटकेत असलेला मंत्री अद्याप पदावर कसा? असा सवाल त्यांनी विचारला.
मनी लाँड्रिंग प्रकरणात राज्याचे मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांचा सत्ताधाऱ्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. या मागणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारने नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायलाच हवा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. राज्याच्या इतिहासात असे कधीच घडलेले नाही. अटकेत असलेला मंत्री अद्याप पदावर कायम आहे. आमची अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आहे. त्यांनी मलिक यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. बाळासाहेब ठाकरे असते तर, एका मिनिटांत त्यांची हकालपट्टी केली असती, असे फडणवीस म्हणाले.