rashifal-2026

विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (12:24 IST)
सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस अत्यंत वादळी ठरला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण न करताच सभागृहातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीका देखील झाली. तर अधिवेशनाच्या दिवशी ओबीसी आरक्षण  आणि नवाब मलिक  यांच्या राजीनाम्याची मागणी या दोन मुद्यांवरून गाजला. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा धक्का बसल्यानं भाजपकडून ठाकरे सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे. पण या मुद्यावरून आक्रमक होताना आमदारांचं निलंबन होणार नाही याची काळजी घ्यावी असा कानमंत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी दिला आहे.
 
तर विधानभवनात भाजपाच्या वतीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली गेली. यावेळी भाजपच्या (BJP) आमदारांनी स्वाक्षरी केल्या. मात्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील यावर स्वाक्षरी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. झालं असं की, विधानभवनाच्या पायऱ्यांच्या शेजारी असलेल्या डायसवर भाजप नेते आपल्या सह्या करत होते. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ तिथं आले. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी नरहरी झिरवाळ यांना सही करण्यासाठी पेन दिला आणि त्यांनी सही केली.
 
विधानसभेत भाजप आमदारांची घोषणाबाजी. विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपनं आंदोलन केलं असून विधानसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; डेटाइतकेच परवडणारे एआय, जिओ भारताला 'इंटेलिजन्स युग'शी जोडेल

Mumbai Radio Club Jetty Project मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल: रेडिओ क्लब जेट्टी टर्मिनलचे काम वेगाने सुरू

LIVE: टिपू सुलतान चौक आता 'अशफाकुल्ला खान' म्हणून ओळखला जाईल

आता ट्रेनच्या शौचालयांमध्ये जुने स्टीलचे मग दिसणार नाहीत, नवीन प्रणालीबद्दल जाणून घ्या

अजित पवारांचा विमान अपघात: तपासासाठी कुटुंब एकत्र आलं, आता सुप्रिया सुळे यांनी आवाज उठवला

पुढील लेख
Show comments