Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भटकंती : २ दिवसांत फिरता येतील अशी मुंबईतील १० प्रेक्षणीय स्थळे

Webdunia
रविवार, 7 जुलै 2024 (07:48 IST)
मुंबईतील धावपळ आणि लोकल ट्रेनचे किस्से तुम्ही सर्वांनी ऐकले असतील. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून धावपळीचे जीवन यासाठी ओळखली जाते. पण मुंबईच्या जवळपास काही अश्या जागा पण आहे ज्या खूप शांत आणि रमणीय आहे. हे सर्व प्रेक्षणीय स्थळे मुंबई शहरापासून १०० ते १५० किमी आहे. जिथे तुम्ही वीकेंड ट्रिप साठी जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊ या मुंबई जवळील शांत व रमणीय पर्यटन स्थळे 
 
मुंबई जवळील प्रेक्षणीय स्थळांबद्द्ल विचार केला तर मुंबई जवळील छोटे छोटे हिल स्टेशन हे लक्षात येतात. या स्थळांवर नैसर्गिक वातावरण सोबत चांगल्या प्रकारची जैवविविधता देखील दृष्टीस पडते. काही जागेचे सौंदर्य थंडी मुळे खुलते तर काही जागेचे सौंदर्य हे पावसामुळे खुलते. या दरम्यान छोटे मोठे धबधब्यांचे सौंदर्य पहावयास मिळते. मुंबई जवळ अश्या काही जागा आहेत जिथे आपण उन्हाळ्यात देखील जाऊ शकतो. सर्व प्रेक्षणीय स्थळे हे वातावरणानुसार फिरण्यासाठी चांगले आहेत. 
 
लोणावळा हिल स्टेशन- मुंबई पासून ८५ किमी अंतरावर असलेले लोणावळा हे हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. तसेच लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून पण ओळखले जाते. तसेच मुंबई जवळ असल्यामुळे महत्व देखील प्राप्त झाले आहे. विशेष करून उन्हाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळामध्ये येतात. तसेच पावसाळ्यात याच्या सौंदर्यात विशेष भर पडते. तसेच पाऊस पडल्यावर लोणावळाचे सौंदर्य अधिक खुलते. इथे सुंदर असे धबधबे तसेच हिरवेगार वातावरण पहावयास मिळेल. ज्यामुळे ही जागा रमणीय वाटेल. नैसर्गिक वातावरण आणि सुंदर ऐसे वातावरण लोणावळ्याची खास गोष्ट आहे. 
 
माळशेज घाट हिल स्टेशन- मुंबई पासून १२५ किमी वर असलेले माळशेज घाट हे मुंबई नाही तर महाराष्ट्रातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांमध्ये येते. या जागेला हिरव्यागार डोंगररांगा आणि थंड वातावरण यामुळे ओळखले जाते. माळशेज घाट बाइकर्सचा सगळ्यात आवडता डेस्टिनेशन आहे. या जागेवर सुंदर असे धबधबे असून हे पावसात हे अजून मनमोहक वाटतात. माळशेज घाट पासून काही अंतरवर एक डैम बनवले गेले आहे. इथे देखील तुम्ही जाऊ शकतात. 
 
माथेरान हिल स्टेशन- मुंबई पासून ८५ किमी आंतरावर असलेले माथेरान महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. मुंबई मधील तसेच जवळपासचे  इतर लोक पण या जागेवर जाणे पसंद करतात. माथेरान हिल स्टेशनवर फिरण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहे. तसेच या जागेवरू पूर्ण सह्याद्रि माउंटेन रेंज चे विहंगमय दृश्य दिसते. व हे पर्यटकांना आकर्षित करते. माथेरान ही स्टेशन हे पूर्ण आशियातील एकमात्र ऑटोमोबाइल फ्री डेस्टिनेशन आहे. यामुळे इथे प्रदुषण नाही.माथेरानला तुम्ही केव्हाही भेट देऊ शकतात पण पावसाळ्यात जाण्याची मज्जा काही वेगळीच आहे. 
 
इगतपुरी हिल स्टेशन- मुंबई पासून साधारण १२० किमी वर असलेले इगतपुरी हिल स्टेशन हे महाराष्ट्रच नाही तर देशातील देखील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येतात. इगतपुरी हिल स्टेशन हे थंड वातावरण आणि हीवेगार डोंगर यांसाठी ओळखले जाते तसेच इथे नैसर्गिक वातावरणात विविध प्रकारची जैव विविधता पहावयास मिळते. या ठिकाणी येऊन तुम्ही  ट्रेकिंग, नेचर वॉक आणि कैम्पिंग आनंद घेऊ शकतात. इगतपुरी बाइकर्सला खूप आवडते. इगतपुरी मध्ये आल्यावर येथील किल्ला, धबधबे आणि मंदिर नक्की पहा. हिवाळा आणि पावसाळा मध्ये इगतपुरी ला नक्की भेट दया. 
 
ताम्हिणी घाट हिल स्टेशन- ताम्हिणी घाट हिल स्टेशन हे मुंबई पासून साधारण १६० किमी दूर आहे. ताम्हिणी  घाट हे पुणे जिल्ह्यात मोटरेबल माउंटेन आहे ज्याचे निर्माण मुख्य रुपने पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडण्यासाठी केला गेला होता. या जागेवर तुम्हाला अनेक डोंगर व डोंगरातून निघणारे धबधबे दिसतील. जे या जागेच्या सौंदर्याला खुलवतात. तसेच तम्हिनी घाट मध्ये कुंडनिका वैली नावाचा एक पॉइंट देखील आहे. जिथे पर्यटकांना जायला आवडते. 
 
जव्हार हिल स्टेशन - मुंबई पासून दूर १४० किमी अंतरावर असेलेल जव्हार हे महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन आहे. इथे पावसाळ्यात अनेक धबधबे याचे सौंदर्य वाढवतात. तसेच इथे एक किल्ला देखील आहे त्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक जव्हार हिल स्टेशन ला भेट देतात. या ठिकाणी सूर्योदयाचे अत्यंत मोहक दृष्य असते. ज्याला एक सनराइज़ पॉइंट देखील संबोधले जाते. जव्हार हिल स्टेशन बद्द्ल अजुन पुष्कळ लोकांना माहीत नाही. म्हणून या जागेवर जास्त गर्दी नसते. ज्यामुळे येथे शांतता असते. 
 
अलीबाग महाराष्ट्र- अलीबाग  हे मुंबईतील एक खास टूरिस्ट डेस्टिनेशन आहे अलीबाग मुंबई पासून साधारण ९५ किमी अंतरावर आहे. अलीबाग हे समुद्र किनारासाठी ओळखले जाते. या ठिकाणी येण्याकरिता तुम्ही २ दिवसांचा वीकेंड प्लान करू शकतात. येथे पुष्कळ वॉटर एक्टिविटीज होते. ज्याचा पर्यटक भरपूर आनंद घेतात. तुम्ही या ठिकाणी येऊन कैम्प देखील लावू शकतात. जे तुमच्या ट्रिपच्या अनुभव वाढवतो. अलीबाग मध्ये तुम्हाला अनेक किल्ले पह्वयास मिळतील. 
 
नाशिक- मुंबई पासून दूर १६० किमी असलेले नाशिक हे पर्यटन स्थळ देखील आहे.  
महाराष्ट्रतील नाशिक हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी प्रेक्षिणय स्थळे पुष्कळ आहे. तॅच नाशिकमध्ये ऐतिहासिक मंदिर आणि ऐतिहासिक किल्ले पह्वयास मिळतील. तसेच धबधबे, ट्रेकिंग स्पॉट देखील आहे. तसेच नाशिक मधील त्र्यंबकेश्वर देखील तुम्ही ट्रिप ला जाऊ शकतात. तसेच तुम्ही पावसाळ्यात व हिवाळ्यात नाशिकची ट्रिप नक्कीच प्लानिंग करू शकतात. 
 
कर्जत हिल स्टेशन- महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत हे हिल स्टेशन मुंबई पासून ६० किमी अंतरावर आहे. कर्जत हिल स्टेशन हे तेथील लोकांची पहिली पसंती आहे. या जागेला वीकेंड डेस्टिनेशन ने पाहिले जाते. या ठिकाणी पर्यटन तसेच ट्रेकिंगसाठी साधन आहेत. येथील ट्रेकिंग पॉइंट सह्याद्रीच्या डोंगरकडयांनी घेरले आहे. 
ट्रेकिंग रस्त्यावर अनेक छोटे मोठे धबधबे पह्वयास मिळतात. कर्जत हिल स्टेशनला तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नक्कीच भेट दया. 
 
शाहपुर हिल स्टेशन-  मुंबई पासून ८५ किमी अंतरवर असलेले शाहपुर हिल स्टेशन हे अनेक लोकांच्या नजरेपासून दूर आहे. हे पर्यटन स्थळ इतर पर्यटन स्थळ पेक्षा कमी प्रसिद्ध आहे. वीकेंड ट्रिप आणि फिरण्याच्या दृष्टीने हे शाहपुर हिल स्टेशन चांगले आहे. शाहपुर हिल स्टेशन  इथे हिरवेगार डोंगर तसेच धबधबे पह्वयास मिळतात. तसेच ट्रेकिंग करण्याबरोबर तुम्ही वाइल्ड लाइफ सेंचुरीचा पण आनंद घेऊ शकतात. 
 
मुंबईच्या जवळपास ट्रिप काढण्यासाठी योग्य वेळ -
मुंबईच्या जवळपासचे वरील हे स्थळे पहायला जायचे असेल तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नक्की जा. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नैसर्गिक सौंदर्य खुलते व आपल्याला निसर्गाच्या जवळ जाण्यास मिळते. जर तुम्ही ट्रिप प्लान करत असाल तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नक्कीच प्लान करा. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

राजस्थान पुष्कर मधील सर्वात मोठ्या जत्रेला भेट द्या

२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन

शाहरुख खानला कोण धमकावत आहे? , सलमान खाननंतर किंग खानच्या जीवाला धोका

महाराष्ट्र सायबर पोलिसांची ऑनलाइन तिकीट बुकिंग वेबसाइट BookMyShow ला नोटीस, काय आहे संपूर्ण प्रकरण

पार्वती हिल पुणे

पुढील लेख
Show comments