Publish Date: Sat, 18 Jul 2026 (07:30 IST)
Updated Date: Fri, 17 Jul 2026 (18:28 IST)
Maharashtra Tourism : लोणावळा, महाबळेश्वर, अलिबाग तर आपण नेहमीच ऐकतो आणि तिथे गर्दीही प्रचंड असते. पण आपल्या महाराष्ट्राच्या कुशीत अशी काही लपलेली ठिकाणे आहे, जिथे गेल्यावर तुम्हाला खरोखरच स्वर्गात आल्यासारखा भास होईल. शांतता, घनदाट झाडी, खळखळणारे झरे आणि अथांग पसरलेला निसर्ग अनुभवायचा असेल, तर या वीकेंडला महाराष्ट्रातील या 'लपलेल्या स्वर्गांना' नक्की भेट द्या!
महाराष्ट्रातील ३ सर्वात सुंदर आणि अनपेक्षित ठिकाणे
१. सांधण व्हॅली अहमदनगर)– 'द व्हॅली ऑफ शॅडो'
जर तुम्हाला साहसाची आवड असेल, तर सांधण व्हॅली हा तुमच्यासाठी सर्वात मोठा थरार आहे. ही आशियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी घळ मानली जाते.
खासियत: दोन अवाढव्य डोंगरांच्या मध्ये असलेल्या केवळ काही फूट रुंद अशा घळीतून चालताना आजूबाजूला सूर्यप्रकाशही पोहोचत नाही, म्हणूनच याला 'व्हॅली ऑफ शॅडो' म्हणतात.
कधी जावे?: नोव्हेंबर ते मे (पावसाळ्यात इथे जाणे अत्यंत धोकादायक असते आणि ट्रॅक बंद असतो). ट्रेकर्स आणि साहसी पर्यटकांसाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे.
२. चिखलदरा अमरावती – विदर्भाचे एकमेव नंदनवन
महाराष्ट्राच्या एका टोकाला सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. पुणे-मुंबईच्या गर्दीपासून दूर असलेल्या या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचा शांत आणि निवांत रंग पाहायला मिळतो.
खासियत: हे महाराष्ट्रातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे कॉफीचे मळे पाहायला मिळतात. येथील भीमकुंड, मेळघाट व्याघ्रप्रकल्प आणि दरीचे नयनरम्य नजारे मनाला भुरळ घालतात.
कधी जावे?: जुलै ते मार्च (पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा परिसर स्वर्गासारखा दिसतो).
३. शिरोडा आणि वेलास बीच सिंधुदुर्ग – गोव्यालाही टक्कर देणारे किनारे
जर तुम्हाला गोव्याच्या गर्दीचा कंटाळा आला असेल आणि शांत, पांढऱ्या वाळूचा निळाशार समुद्र अनुभवायचा असेल, तर शिरोडा बीच हा सर्वोत्तम पर्याय आहे.
खासियत: हा किनारा इतका स्वच्छ आणि शांत आहे की तुम्हाला फक्त लाटांचा आवाज ऐकू येईल. येथील नारळी-सुपारीच्या बागा आणि अथांग शांतता पर्यटकांना भुरळ घालते.
कधी जावे?: ऑक्टोबर ते मार्च.
महाराष्ट्र हा निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि साहसाचा खजिना आहे. एका वेळी तरी इथे या ठिकाणांना भेट द्या आयुष्यात कधीही विसरणार नाही असा अनुभव मिळेल. तसेच निसर्गाचा मान राखा आणि या लपलेल्या निसर्गरम्य ठिकाणी जाताना प्लास्टिकचा कचरा करू नका. निसर्गाचे सौंदर्य जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik