Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजे-महाराजांच्या काळापासून प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील देवीची मंदिरे

Goddess Temples
Maharashtra Tourism : नवरात्रीचे शुभ पर्व सुरु होणार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे प्रसन्न असतात. अनेक जण देवी दर्शन घेण्यासाठी जागृत मंदिरांना भेट देतात तसेच महाराष्ट्रात प्राचीन काळापासून राजे-महाराजे, मराठा साम्राज्य, यादव घराण, आणि चालुक्य-शिलाहार राजांच्या आश्रयाने उभारलेली व पूजली गेलेली अनेक प्रसिद्ध देवीची मंदिरे आहे. राजांच्या ऐतिहासिक कथा व राजघराण्यांशी जोडलेली महाराष्ट्रातील प्रमुख देवीची मंदिरे आज आपण पाहणार आहोत. जिथे तुम्ही अवश्य भेट देऊ शकतात.
ALSO READ: “विदर्भाची कुलस्वामिनी” कोराडीचे श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर एक जागृत शक्तीपीठ

श्री तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर, धाराशिव):

ऐतिहासिक संदर्भ: छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसले राजघराण्याची ही कुलदेवता आहे. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी तुळजाभवानी देवीनेच आशीर्वाद दिला होता. मराठा राजांच्या सैन्याचा हा मुख्य श्रद्धास्त्रोत होता.

श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर (कोल्हापूर):

ऐतिहासिक संदर्भ: हे मंदिर ७ व्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव याच्या काळात बांधले गेले आणि पुढे शिलाहार व यादव राजांच्या काळात त्याचा विस्तार झाला. कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि पेशवे यांच्या काळात या मंदिराला विशेष राजाश्रय लाभला.

श्री रेणुका माता मंदिर (माहूरगड, नांदेड):

ऐतिहासिक संदर्भ: साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक महत्त्वाचे मूळ स्थान आहे. १३ व्या शतकात देवगिरीच्या यादव राजांच्या काळात या मंदिराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला व यादव राजांची या देवीवर गाढ श्रद्धा होती.

श्री सप्तश्रृंगी देवी मंदिर (वणी, नाशिक):

ऐतिहासिक संदर्भ: अर्धे शक्तिपीठ मानल्या जाणाऱ्या या मंदिराचा इतिहास पेशवेकालीन व त्यापूर्वीच्या राजांशी जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नाशिक-खानदेश मोहिमेदरम्यान या देवीचे दर्शन घेतल्याचे ऐतिहासिक उल्लेख मिळतात.

श्री शिर्काई देवी मंदिर (रायगड किल्ला):

ऐतिहासिक संदर्भ: मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील ही मुख्य अधिष्ठात्री देवी आहे. शिवकाळात आणि पेशवाईच्या काळात गडावरील संकट टळण्यासाठी शिर्काई देवीची पूजा केली जात असे.

श्री यमाई देवी मंदिर (औंध, सातारा):

ऐतिहासिक संदर्भ: हे मंदिर सातारा जिल्ह्यातील औंध येथील पंतप्रतिनिधी (राजे) घराण्याचे कुलदैवत आहे. टेकडीवर वसलेले हे भव्य मंदिर राजे-महाराज आणि मराठा सरदारांच्या दातृत्वातून उभारले गेले आहे.

श्री एकवीरा देवी मंदिर (कार्ला, लोणावळा):

ऐतिहासिक संदर्भ: कार्ला लेण्यांच्या जवळ असलेले हे मंदिर कोळी समाज आणि अनेक मराठा घराण्यांचे कुलदैवत आहे. शाहू महाराज आणि पेशव्यांच्या काळात या मंदिराला मोठे महत्त्व प्राप्त झाले होते.

''भवानी माता मंदिर प्रतापगड'' सातारा

 प्रतापगड किल्ल्यावरील भवानी माता मंदिर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६१ मध्ये या मंदिराची स्थापना केली. श्री छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे परमभक्त होते. परंतु, राजकीय आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे दरवेळी तुळजापूरला जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रतापगडावरच भवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
ALSO READ: सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ''भवानी माता मंदिर प्रतापगड'' सातारा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले