Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माथेरान हिल स्टेशन

Webdunia
शनिवार, 5 जून 2021 (22:25 IST)
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या,लांब,सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल, सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत,भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत.या वेळी आपण भारतातील शीर्षच्या हिल स्टेशन माथेरान बद्दल जाणून घेऊ या. 
 
1 हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे.
 
2 माथेरानला  दशातील सर्वात लहान हिल स्टेशनचा दर्जा मिळाला आहे परंतु  हे एक सुंदर हिल स्टेशन आहे.
 
3 येथे बघण्यासाठी बरेच व्यू पॉइंट्स, तलाव आणि उद्याने आहेत ज्यात मँकी पॉईंट, लिटिल चॉक, चॉक पॉइंट, इको पॉईंट, मनोरमा पॉईंट, सनरायझ आणि सनसेट पॉईंट प्रामुख्याने आहे.
 
4 इथं धबधबे आणि ढग बघण्याची मजाच काही वेगळी आहे. ढगांनी वेढलेले पर्वत आणि पर्वतातून पडणारे धबधबे बघून आश्चर्य कराल . या अद्भुत दृश्यांचा आनंद घेणं स्वतःला रोमांचित करणारे आहे.
 
5 इथे जेवढे उंच पर्वत आश्चर्यात टाकणारे आहेत तेवढेच खालील खोऱ्या बघून मन आनंदित होते.डोंगराच्या मध्यभागी असलेल्या खोऱ्या, सरळ उतार आणि मैदानाची विहंगम दृश्ये मंत्रमुग्ध करतात.
 
6 माथेरान हे चहू बाजूने हिरवीगार घनदाट झाडे आणि सपाट डोंगरांनी वेढलेले आहे, जिथे सर्व बाजूस पाऊलवाटा आहे.म्हणून इथे पायी फिरण्याचा मज्जाच काही वेगळा आहे.
 
7 इथे मोटार वाहनांना प्रवेशास पूर्णपणे मनाई आहे.जरी,स्वारीसाठी घोडे,खेचरे,हात रिक्षा,पालकी उपलब्ध आहे.परंतु आपण पायी फिरून संपूर्ण हिल स्टेशनचा मजा घेऊ शकता.
 
8  माथेरानमध्ये एक सुंदर तलाव देखील आहे. कच्च्या पाऊलवाटाने  दरी खाली जाताना तलावावरही पोहोचता येते जिथून संपूर्ण माथेरानला पाणीपुरवठा केला जातो.
 
9 जर आपल्याला मुंबईहून माथेरानला जायचे असेल तर उत्तम पर्याय म्हणजे माथेरान बाजार रेल्वे स्थानकात पर्यटकांना नेण्यासाठी सुमारे 22 कि.मी.चा प्रवास करत मुंबई जवळ नेरुळ जंक्शनपासून दोन फूट रुंद नैरो गेज मार्गावर धावणारी टॉय ट्रेन आहे. जरी ही ट्रेन आरामात जाते, परंतु प्रवास जितका जास्त लांब असेल तितकाच प्रवासाचा आनंद घेतला जातो. कारण प्रवासामध्ये बरेच तीक्ष्ण आणि फिरणारी वळण आढळतात की काहीवेळा संपूर्ण ट्रेन किंवा पुढील मागील डबे देखील बर्‍यापैकी पूर्ण दिसतात. यासह, मार्गातील नैसर्गिक दृश्ये देखील खूप रोमांचकारी आहेत.
 
10 पावसाळ्याच्या हंगामाशिवाय इतर कोणत्याही वेळी येथे भेट दिली जाऊ शकते. पावसाळ्यात घनदाट ढग असतात , ज्यामुळे दूरदूरपर्यंत दृश्ये कमी दिसतात. तसेच येथील कच्च्या रस्त्या मुळे  घसरण्याचा धोकाही वाढतो.
 
11येथे राहण्याची आणि खाण्याची कोणतीही समस्या नाही, परंतु आपण स्वतःहून खाण्यापिण्याची व्यवस्था घेतली तर पायी चालताना अडचण येणार नाही. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध गायिकाचे कर्करोगाने वयाच्या 44 व्या वर्षी निधन

बलात्कार प्रकरणात अजाज खानला कोर्टाकडून झटका अटकपूर्व जामीन नामंजूर

रेड 2' च्या यशा दरम्यान ईदला प्रदर्शित होणार अजय देवगणचा चित्रपट

नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा युरोपमधील एक छोटासा देश पोलंड

लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

पुढील लेख
Show comments