Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

स्वयंभू असे हे शक्तिपीठं 'वणीची देवी सप्तशृंगी'

Saptashrungi Devi Temple
सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. सप्तशृंगी देवीचे नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे.
 
या मागील अशी आख्यायिका आहे की महिषासुर मर्दन करण्यासाठी देवतांनी त्यांची याचना केली त्यामुळे देवी होमातून प्रकट झाली. तिचे हेच रूप म्हणजे सप्तशृंगीचे होते. हिला ब्रह्मस्वरूपिणी देखील म्हणतात. हे ब्रह्मदेवाच्या कमंडळापासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रूप तसेच महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे त्रिगुणात्मक असे स्वरूप म्हणजे देवी सप्तशृंगी. 
 
या महिरपीत देवीची मूर्ती आठ फुटी उंच आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्णी आहे. या देवीचे डोळे तेजस्वी असून टपोरे आहेत. सर्व हात एकमेकांना लागलेले आहेत. महिषासुराशी लढण्यासाठी देवीला सर्व देवांनी शस्त्रे दिलेली असे. श्री भगवतीला १८ हात असून तिला अष्टादश देवी असेही म्हणतात. प्रत्येक हातामध्ये तीन आयुध धारण केलेली आहेत.
 
श्री सप्तश्रृंग देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो. श्री भगवतीची मूर्ती ८ फुट उंचीची असल्याने देवीला ११ वार साडी व चोळीला ३ खण लागतात. डोक्यावर मुकूट कानात कर्णफुले, नाकात नथ,गळ्यात मंगळसुञ, पुतळ्यांचे गाठले. कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज अंगावर घालण्यात येतात.
 
प्राचीन काळात सप्तशृंग हे दंडकारण्याचा एक भाग होता. ऋषी मार्कंडेय आणि ऋषी पाराशर यांनी इथेच तपश्चर्या केली होती. या गडावर चढून मंदिरात जाण्यासाठी साधारणपणे 500 पायऱ्या चढून जावं लागतं. सकाळी सहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिरात पूजा केली जाते. सप्तशृंगगड पश्चिमी डोंगराच्या रांगेत समुद्रतळा पासून साडेचार हजार फुटी उंचीवर आहे. येथे बरेच प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्र आहे. असे म्हणतात की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम येथे आले असे. 
 
या सप्तशृंगी देवीच्या विरुद्ध दिशेला जवळच्या डोंगरावर मच्छिन्द्रनाथाचे मंदिर आहे. त्याचा समोर मार्कंडेय ऋषींचे डोंगर आहे अशी आख्यायिका आहे की मारुतीने लक्ष्मणासाठी याच डोंगरावरून औषधी वनस्पती आणली होती. 

पूर्वी गडावर १०८ कुंड असल्याचा उल्लेख आहे. त्यातील दहा ते पंधरा अस्तित्वात आहेत. देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला त्यामुळे पाणी लालसर झालं अशी तर काजलतीर्थ या कुंडात देवीनं काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं अशी अख्यायिका आहे. 
 
या गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गुडी पाडवा, चेत्रोत्सव, गोकुळाष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी उत्सव, लक्ष्मी पूजन, हरिहर भेंट, महाशिवरात्र इत्यादी महोत्सव या गडावर साजरे केले जातात.
 
जाण्याचा मार्ग - 
सप्तशृंग गडावर जाण्यासाठी नासिकवरून राज्यपरिवहन महामंडळाच्या बस आहेत. नाशिक वरून येथील जाण्याचे अंतर सत्तर किलोमीटर एवढे आहे.

photo: official site

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dalip Tahil : ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 65 वर्षीय अभिनेता दलीप ताहिल तुरुंगात