Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील जुहू बीचच नाही, तर हे बीच देखील खास आहे

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (23:21 IST)
महाराष्ट्रातील जुहू बीच खूप लोकप्रिय आहे आणि लोकांना येथे चांगला वेळ घालवायला आवडते. पण महाराष्ट्रातील हा एकमेव समुद्रकिनारा नाही, तर इथे तुम्ही इतर अनेक समुद्रकिनारे अगदी सहजपणे एक्सप्लोर करू शकता. अशाच काही बीचची माहिती जाणून घेऊ या.
 
1डहाणू-बोर्डी बीच-
डहाणू-बोर्डी बीच मुंबईपासून 145 किमी अंतरावर ठाणे किनारपट्टीवर पसरलेला आहे. जर आपण एडव्हेंचर्स करण्याची आवड ठेवता तर या बीच वर आपण ग्लाइडिंग, ट्रेकिंग, पतंग उडवणे इत्यादी क्रीडा क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकता. याशिवाय, आपण  ऐतिहासिक बहरोट गुहेला देखील भेट देऊ शकता, जे मुख्यतः पारशी आणि उदवाडा यांचे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे हजारो वर्षे जुना पवित्र अग्नी आजही तेवत आहे.
 
2 श्रीवर्धन हरिहरेश्वर-
महाराष्ट्रातील कोकण सीमेवर वसलेला, श्रीवर्धन हरिहरेश्वर समुद्रकिनारा त्याच्या शांत परिसरासाठी ओळखला जातो. ज्यांना सूर्यस्नान, समुद्रकिनाऱ्यावर चालणे, योग आणि ध्यान यासारख्या आरामदायी क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी हे एक योग्य ठिकाण आहे. श्रीवर्धन हरिहरेश्वर बीचवर अनेक रेस्टॉरंट्स आहेत जिथे  उत्तम सीफूडचा आस्वाद घेऊ शकता. एवढेच नाही तर, पेशवे किंवा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान जिथे राहत होते ती सुंदर भूमी पाहण्यासाठी  बोटीतून प्रवास करू शकता. पेशवे स्मारक आणि हरिहरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.
 
3 तारकर्ली बीच-
मालवणच्या दक्षिणेस 6 किमी आणि मुंबईपासून 546 किमी अंतरावर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर उंच सुरुची झाडे आणि कार्ली नदीने वेढलेला तारकर्ली बीच आहे. तारकर्ली बीचचे पाणी अगदी स्वच्छ आहे. येथे आपण स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंग, बीच वॉकिंग, सन बेसिंग, सन बाथिंग इत्यादी अनेक गोष्टी करू शकता. तारकर्ली बीचजवळ पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.   येथे 17 व्या शतकात बांधलेले सिंधुदुर्ग किल्ला आणि पद्मगड किल्ला महाराष्ट्रातील दोन सर्वात महत्त्वाचे सागरी किल्ले आहेत. 
 
4 मार्वे मनोरी आणि गोराई बीच- 
मुंबईत मार्वे मनोरी आणि गोराई समुद्रकिनारा आहे जे अनेक पर्यटकांना आकर्षित करतात. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विलक्षण दृश्य येथे पाहता येते. हे तीन छोटे बीच  नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहेत येथे लोकांना रात्री उशिरापर्यंत पार्टी करायला आवडते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

पुष्पा 2'चा ट्रेलर कधी येतोय ते जाणून घ्या

जेव्हा श्रीदेवी बोनी कपूरवर चिडल्या

19 वर्षांनी शक्तीमान परतणार, मुकेश खन्ना यांनी दिलेलं वचन केले पूर्ण

यक्ष आणि गंधर्वांनी बांधलेले गुहा मंदिर आजही येथे आहे

ज्येष्ठ तमिळ अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

पुढील लेख
Show comments