Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रतिबालाजी मंदिर पाषाण पुणे

Webdunia
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
महाराष्ट्रातील पुणे मध्ये प्रतिबालाजी मंदिर हे श्री बालाजी यांना समर्पित आहे. जे भगवान विष्णुचे एक रूप आहे. तसेच आंध्र प्रदेश मधील एक लोकप्रिय देवता आहे. प्रतिबालाजी तिरुमाला तिरुपती मंदिरचे वेंकटेश्वरशी जोडलेले आहे. ज्याचा संस्कृत मध्ये शाब्दिक अर्थ आहे 'पापांचा नाश करणारा'. तसेच पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेल्या भवानी पेठेत हे मंदिर आहे.
 
मंदिराचा परिसर कमीतकमी 200 मीटर पर्यंत पसरलेला आहे. छोट्या गर्भगृह मध्ये मोकळ्या हवेमध्ये सभा मंडप आहे. जिथे मंडळी जमा होतात. मंदिरातील मूर्ती ही बसलेल्या स्थिती मध्ये आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणामधून कोरलेली असून मूर्तीची उंची साधारण पाच फूट आहे. या मंदिरात जास्त करून पुण्यातील तेलगू समाजाचे लोक दर्शनासाठी येतात.  
 
वेंकटेश्वर देवता यांच्याशी जोडलेल्या अनेक आख्यायिका आहे. यामधील एक आख्यायिका कुबेर यांच्याशी जोडलेली आहे. जे हिंदू पौराणिक कथांमधील एक देव-राजा आहे. ज्यांना धनाचे देवता म्हणून पूजले जाते. आख्यायिकेनुसार भगवान कुबेरांनी एक अट ठेवली होती की, वेंकटेश्वर आपले ऋण फेडल्याशिवाय वैकुंठात जाऊ शकणार नाही. या प्रकारे व्यंकटेश्वर आंध्र प्रदेशमधील तिरुमला मध्ये राहतात. व ऋण फेडल्यानंतरच वैकुंठात जाऊ शकतील.
 
श्री बालाजी मंदिर ट्रस्ट ही मंदिराची प्रशासकीय संस्था आहे. तसेच 2014 मध्ये मंदिराचा विकास आणि जीर्णोद्धार झाला. ट्रस्ट मंदिरात येणाऱ्या भाविकांना निवास, परवडणाऱ्या दरात जेवण, अल्पोपहार आणि रेल्वे आरक्षण अशा विविध सुविधा पुरवते.
 
तिरुमला मंदिराच्या गर्भगृहात देवतेसाठी प्रथम पहाटेचा विधी केला जातो, जो सर्व बालाजी मंदिरांमध्ये पाळला जातो. पुण्यामधील हे बालाजी मंदिर पुण्यातील तेलगू समुदायासाठी श्रद्धास्थान आहे. तसेच इतर भाविक देखील दर्शनासाठी मंदिरात दाखल होतात.  

पुणे जिल्हा हा अनेक महामार्गांना जोडलेला आहे. तसेच रस्ता मार्ग, रेल्वे मार्ग, विमान मार्ग याने पुण्यामध्ये सहज पोहचता येते. कॅब, रिक्षा किंवा खासगी वाहन, परिवहन बस ने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला झाला गंभीर आजार

राजकुमार हिरानी आणि आमिर खानची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करणार, घेऊन येत आहे दादासाहेब फाळके यांचा बायोपिक

अनुपम खेर त्यांच्या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटातही काम करणार

अजय देवगणचा मुलगा युग देवगण देखील चित्रपटांमध्ये पदार्पण करणार

'ती'च्या आत्मसन्मानाही कथा सांगणार ‘वामा – लढाई सन्मानाची’

सर्व पहा

नवीन

अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप

बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

Saint Ziparu Anna Maharaj संत झिपरू अण्णा महाराज समाधी मंदिर

कैंची धाम कुठे आहे? हे का प्रसिद्ध आहे? इतिहास काय आणि तिथे कसे पोहचायचे

पुढील लेख
Show comments