Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थान चौंडी अहमदनगर

birthplace Ahilyabai Holkar
, शनिवार, 31 मे 2025 (07:30 IST)
भारतात अनेक पराक्रमी योद्धे होऊन गेले त्याचबरोबर शूर महिलांनी देखील या भारतवर्षात इतिहास घडवला आहे. कर्तृत्वाने आणि पराक्रमाने त्यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षराने लिहिले गेले आहे. अश्याच या धाडसी, पराक्रमी वीरांगना पैकी एक होत्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. ज्या महादेवांच्या खूप मोठ्या भक्त होत्या. ज्या समाजकार्यासाठी आणि पराक्रमासाठी संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध होत्या. 
पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला होता. अहिल्याबाईंचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते.  माणकोजी शिंदे हे धार्मिक आणि सुशिक्षित व्यक्ती होते.  वडिलांनी धार्मिक आणि नैतिक शिक्षण अहिल्याबाईंना दिले होते. लहानपणासूनच अहिल्याबाई या धाडसी आणि न्यायप्रिय होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावात अहल्याबाईंची अतिशय सुंदर अशी प्रतिमा आहे. तुम्ही येथे नक्कीच भेट देऊ शकतात. 
 
तसेच अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला, ज्यामुळे त्या होळकर घराण्याची सून झाल्या. तसेच अहिल्याबाई होळकर १८ व्या शतकात माळवा प्रदेशातील मराठा साम्राज्याच्या महाराणी होत्या. तसेच त्यांनी  केवळ माळवाला समृद्ध आणि सक्षम केले नाही तर संपूर्ण भारतात धर्म, संस्कृती आणि सेवेचे एक उदाहरण सादर केले, ज्याची तुलना आजही करणे कठीण आहे. अहिल्याबाई केवळ राणी नव्हत्या, तर त्या एक विचार, सेवा, समर्पण आणि मजबूत नेतृत्वाचे प्रतीक होत्या. १८ व्या शतकात, जेव्हा भारत राजकीय अस्थिरता आणि सामाजिक विभाजनातून जात होता, तेव्हा दृढ इच्छाशक्ती असलेल्या एका महिलेने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली आणि त्याला एक नवीन आकार दिला. तसेच देवी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन समाज, संस्कृती आणि राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित होते.  
तसेच खंडेरावांच्या मृत्यूनंतर आणि नंतर मल्हाररावांच्या मृत्यूनंतर, राज्याची सूत्रे अहिल्याबाईंच्या हाती आली. त्यावेळी एका महिलेने राज्यकारभार हाती घेणे असामान्य होते, परंतु अहिल्याबाईंनी हे सिद्ध केले की कार्यक्षम नेतृत्व लिंगावर नव्हे तर वृत्तीवर अवलंबून असते.  
 
३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
तसेच दरवर्षी चौंडी गावात अहिल्याबाई यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने चौंडी गावात विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याशिवाय, देशभरातील विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चर्चासत्रे, सादरीकरणे आणि व्याख्याने आयोजित केली जात आहे. या कार्यक्रमांचे उद्दिष्ट नवीन पिढीपर्यंत त्यांचा वारसा पोहोचवणे आणि समाजात त्यांचे आदर्श पुन्हा स्थापित करणे आहे.
 
अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थान चौंडी अहमदनगर जावे कसे? 
अहमदनगर हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक असून...हे शहर रस्ता मार्ग आणि रेल्वे मार्गाने अनेक शहरांना जोडलेले आहे. तसेच स्थानिक बस किंवा रिक्षा, कॅप च्या मदतीने चौंडी यागावात सहज पोहचता येते.
ALSO READ: पर्यटन, खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेले प्रगत शहर इंदूर मध्य प्रदेश

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्शद वारसीवर सेबीची मोठी कारवाई, शेअर बाजारात फसवणुकीचा आरोप