Maharashtra Tourism : रंकाळा तलाव हे कोल्हापूर शहराचे वैभव आणि भावनिक केंद्रबिंदू आहे. तसेच हा फक्त तलाव नव्हे तर एक परंपरा, इतिहास आणि निसर्गसौंदर्याचा संगम आहे.
ALSO READ: महाराष्ट्रातील ५ रहस्यमय किल्ले आणि ठिकाणे
तसेच हा एक मोठा आणि सुंदर नैसर्गिक तलाव आहे, जो ऐतिहासिक आणि भूवैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानला जातो. काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हा तलाव नैसर्गिक भूकंपामुळे किंवा खाणीच्या ठिकाणी तयार झाला असावा.
ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व
तलावाच्या अगदी जवळच संध्यामठ नावाचे सुंदर मंदिर आहे, जे तलावाच्या सौंदर्यात भर घालते. रंकाळा तलावाच्या काठावर संध्याकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते, ज्यामुळे या भागाला 'कोल्हापूरची रंकाळा चौपाटी' असेही म्हटले जाते. तसेच रंकाळा तलावाचा सूर्यास्त पाहण्यासारखा असतो. तलावाच्या काठावर लहान मुलांसाठी खेळणी, खाण्याचे स्टॉल्स आणि मनोरंजन केंद्रे आहे. तसेच फिरण्यासाठी, जॉगिंगसाठी आणि सायकलिंगसाठी तलावाभोवती सुंदर पदपथ तयार करण्यात आलेला आहे. तलावाच्या दुसऱ्या बाजूला शालिनी पॅलेस आहे, जो पूर्वी राजघराण्याचा होता आणि आता त्याचे रूपांतर हॉटेलमध्ये झाले आहे.
बांधकाम आणि जीर्णोद्धार
छत्रपती शाहू महाराजांनी या तलावाची देखभाल आणि जीर्णोद्धार करून याला सध्याचे स्वरूप दिले. हा तलाव कोल्हापूरच्या नैसर्गिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तसेच मूळचे नाव “रंकभैरव तलाव” आहे. पुढे लोकभाषेत “रंकाळा” झाले. छत्रपती शाहू महाराजांनी तलावाची भिंत, रस्ते, उद्यान आणि प्रकाशयोजना करून त्याला आजचे स्वरूप दिले. तसेच १९०० च्या दशकात येथे महाराजांचा घोडेस्वारी सराव आणि नौकाविहार चालायचा. तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल, तर रंकाळा तलावाला नक्की भेट द्या.
बेस्ट व्हिजिट टाइम
पावसाळा (जुलै- सप्टेंबर): तलाव भरलेला आणि हिरवागार
हिवाळा (नोव्हेंबर- फेब्रुवारी): फिरायला आणि बोटिंगला उत्तम हवामान
संध्याकाळ ५ ते ८ वाजता सर्वाधिक गर्दी आणि सुंदर वातावरण
रंकाळा तलाव कोल्हापूर जावे कसे?
रेल्वे मार्ग- छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर रेल्वे स्थानक तलावापासून ४ किमी अंतरावर आहे. स्टेशवरुन रिक्षा किंवा स्थानिक वाहनाने सहज पोहचता येते.
रस्ता मार्ग-कोल्हापूरला जाण्यासाठी अनेक बस उपलब्ध आहे. तसेच कोल्हापूर अनेक प्रमुख शहरांना रस्ता मार्गाने जोडलेलं आहे.
विमान मार्ग- कोल्हापूर विमानतळ तलावापासून १० किमी अंतरावर आहे. विमातळावर उतरल्यानंतर
स्थानिक रिक्षाने किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येते.